बोईसर निंबा स्पावर पोलिसांचा छापा…डमी ग्राहक पाठवून बोईसर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पथकाने केली कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्व परिसरात मॅकडीच्या बाजूलाच असलेल्या अयु प्लाझा मध्ये सुरू असलेल्या स्पावर बोईसर ठाणे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी शिताफीने छापा टाकला आहे.डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर करण्यात आलेल्या या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून स्पा चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बोईसर पूर्व भागात सुरू असलेल्या निंबा स्पामध्ये देहव्यापाराचा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव प्राप्त झाली होती.या गोपनीय माहितीच्या आधारे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी डमी ग्राहक पाठवून या स्पा मध्ये देह व्यापार केली जात असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी योग्य नियोजन करत अचानक छापा टाकून ही कारवाई केली आहे.
या छापा कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर बोईसर पोलिसांची नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



