महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि भांडार शाखाप्रमुखाने ठेकेदाराकडून घेतली 20 हजार रुपयांची लाच

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
एका विद्युत खाजगी ठेकेदाराकडे 20.000 हजार रुपयांच्या लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि शाखा भांडार प्रमुखाला मंगळवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके आणि पोलीस निरीक्षक किरण कुमार वाघ यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्या विरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
व्यवसायाने विद्युत ठेकेदार असलेल्या तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई सेक्टर 16 ए वाशी नवी मुंबई येथील कार्यालयीन विद्युत उपकरणे देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत एक वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे.
या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येकी महिन्याला त्यांना 26 हजार 400 रुपये व अधिक टक्केवारी अशी एकूण वार्षिक रक्कम 3 लाख 16 हजार आठशे रुपये मिळणार होते.
हे बिल मंजुरी करिता शिक्षण विभाग मंडळ वाशी नवी मुंबई सेक्टर 16 ए वाशी नवी मुंबई येथे सादर केल्यावर या विद्युत ठेकेदाराकडे राजेंद्र माणिक अहिरे वय वर्ष (55) विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांनी मनोहर लक्ष्मण पवार वय वर्ष (50) भांडार शाखाप्रमुख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे एकूण रकमेच्या सात टक्के प्रमाणे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत विद्युत ठेकेदार (तक्रारदार ) यांनी या दोन लोकसेवकांची लेखी तक्रार 25 मार्च 2026 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई कार्यालयात केली होती. या तक्रारीची पडताळणी या कार्यालयामार्फत पूर्ण झाल्यावर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील- लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे- लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे- लाच लुचपच प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके – लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई, पोलीस निरीक्षक किरण कुमार नामदेव वाघ यांच्या पथकाने मंगळवार दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम राजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या केबिनमध्ये स्वीकारल्यावर त्यांना सापळा रचून रंगे हात अटक करून त्यांच्यासोबत असलेला दुसरा आरोपी मनोहर पवार यांच्यावर देखील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.



