क्राईम

GST कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अमित गिरी आणि त्यांची खाजगी सहायक महिला लाच स्वीकारताना नवी मुंबई एसीबी धर्मराज सोनके यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

थकीत कर फाईल बंद करण्यासाठी लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार केल्याप्रकरणी जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांच्या एका खाजगी महिला सहकारी यांना लाच लुचपत प्रतिबंध विभाग नवी मुंबई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

नवी मुंबई कोपरखैरणे येथील एका (28) वर्षीय युवा तरुणाचा सॉफ्टवेअर आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे.त्याच्या या व्यवसायाला जीएसटी विभागाकडून पी.टी.ई.सी आणि पी.टी.आर.सी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीबाबत खुलासा आणि संदर्भ स्पष्टीकरण देण्यासाठी तक्रारदार बेलापूर कार्यालयात गेले असताना या कार्यालयातील ( GST) व्यवसाय कर वरिष्ठ अधिकारी अमित भानुदास गिरी वय वर्ष (45)यांनी त्यांची सहाय्यक वैशाली कदम वय वर्ष (39) राहणार नेरूळ नवी मुंबई यांची भेट घेण्यास सांगितले

यावेळी वैशाली कदम यांनी तक्रारदार यांना एकूण 23 हजार 900 भरण्याची मागणी केली यापैकी 13 हजार 900 रुपये अधिकृत शुल्क होते. तर जास्तीचे 10 हजार रुपये हे थकीत कर फाईल बंद करण्यासाठी लाच म्हणून मागितले होते.
याबाबत तक्रारदार यांनी 2 एप्रिल रोजी 2026 रोजी या लाचखोर अधिकाऱ्यांची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयात केली होती.

या तक्रारीची पडताळणी या कार्यालयामार्फत करण्यात आल्यावर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन ब्युरो विभाग ठाणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई विभाग पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने सोमवार दिनांक 06 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 06. 35 वाजता सापळा रचून खाजगी सहाय्यक महिला वैशाली कदम हिने तक्रारदार यांच्याकडून 2 हजार रुपये रजिस्ट्रेशनच्या नावावर व मुख्य आरोपी अमित गिरी यांनी त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदार यांच्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना या दोघांना रंगेहात अटक करून त्यांच्यावर बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button