वर्दी काढून दंड थोपटत प्रवाशाला मैदानात येण्याचे आवाहन करणारा सफाळे एसटी आगराचा चालक अखेर निलंबित..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे बस आगरातील चालक ऑन ड्युटी कार्यरत असताना प्रवाशासोबत वाद झाल्यावर सरकारी युनिफॉर्म काढून प्रवाशाला बस मधून खाली उतरून मैदानात ये असे आवाहन करणाऱ्या या बस चालकावर एसटी महामंडळाच्या पालघर विभागीय कार्यालयाने कारवाई करून त्याला अखेर सोमवारी निलंबित केले आहे.
एसटी महामंडळाच्या पालघर उपविभागीय कार्यालयाने ही कारवाई करून सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी सफाळे एसटी आगरातील बस चालक अश्वजीत कांबळे यांना अखेर सेवेतून निलंबित केले आहे.28 मार्च 2026 रोजी दातिवरे बस मध्ये बसलेल्या प्रवाशांची बस लेट झाली या कारणावरून प्रवाशांनी चालकाला जाब विचारला होता. यामुळे प्रवाशी आणि चालकांमध्ये वाद झाला होता.या वादामध्ये चालक अश्वजीत कांबळे यांनी आपला युनिफॉर्म काढून या प्रवाशाला बस मधून खाली ये असे दंड थोपटत आवाहन केले होते.यामुळे प्रवाशांनी वाहकांच्या वाहतुकीवर आक्षेप घेत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर पालघर एसटी महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाने अखेर सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी त्याच्यावर कारवाई करून त्याला सेवेतून निलंबित केले आहे.
अशी माहिती टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्कला सफाळे एसटी आगर वाहतूक नियंत्रक भारत वाघमोडे यांनी दिली आहे.



