मुंबई मंत्रालयातील अर्थ नियोजन कक्ष अधिकारी विलास लाड यांच्या लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी आवळल्या मुस्क्या

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
मुंबई अर्थ नियोजन कक्ष अधिकारी विलास लाड यांनी निधी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या पथकाने पंचा समक्ष रविवारी रंगेहात अटक करून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार यांच्या गावातील मूलभूत सुविधा आणि विकास कामांकरिता शासकीय निधी मंजूर करण्याच्या कामाकरिता तक्रारदार यांच्या गावातील सरपंच यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते .
या अनुषंगाने तक्रारदार मंत्रालय मुंबई अर्थ नियोजन कक्ष अधिकारी विलास ज्ञानोबा लाड यांच्याकडे निधी मंजूर करून मिळवण्यासाठी येजा करत होते.मूलभूत सुविधांचे विकास कामाकरिता व अल्पसंख्यांक योजने अंतर्गत शासकीय निधी मंजूर करून देण्यासाठी 09 मार्च 2026 रोजी या अधिकाऱ्याने तक्रारदार यांच्याकडे 06 लाख 37 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदार यांनी या लाचखोर अधिकाऱ्याची लेखी तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग मुंबई कार्यालयात केली होती.
या तक्रारीची या कार्यालयाने 16 मार्च 2026 रोजी पडताळणी करून अजित सुळे सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) लाच लुचपत प्रतिबंध मुंबई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्या पथकाने रविवार दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी मुंबई खारघर येथे सापळा रचून पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून 06 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना विलास ज्ञानोबा लाड यांना रंगेहात अटक करून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची यशस्वी सापळा कारवाई अजित सुळे सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) लाज लुचपस प्रतिबंध विभाग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई आणि पर्यवेक्षक अधिकारी पोलीस निरीक्षक सागर आरगडे आणि पोलीस कर्मचारी या पथकाने केली आहे.



