पनवेल सिडको अधिकारी आणि त्यांच्या पत्नीवर 1.94 कोटी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी.. एसीबी धर्मराज सोनके यांनी कारवाई करून केले गुन्हे दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
बेहिशोबी मालमत्ता नावावर असणाऱ्या सिडको माजी सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यावर आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी विरुद्ध नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरो विभाग पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने गुरुवारी कारवाई करून या दोघांविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपी सागर मदनलालजी तापडिया वय वर्ष (54 )तत्कालीन वसाहत अधिकारी सिडको पनवेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या एकूण मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक धर्मराज सोनके यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र, व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सागर मदनलालजी तापडिया आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली असता सागर तापडिया यांना एकूण 1.12 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 1.42 कोटी रुपये ठेवण्यात आले होते व यापैकी 1.64 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
या सर्वांचा हिशोब करता आरोपीकडे 1.94 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे.ही रक्कम त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 173.36 टक्के आहे.यापैकी 75 टक्के रक्कम त्यांची पत्नी मनीषा तापडिया यांच्या नावावर आहे . असे चौकशी आणि तपासात उघड झाल्यावर 1.94 कोटीची अपसंपदा संपादित करण्यासाठी त्यांच्या पत्नी मनीषा ताडपिया यांनी हेतू पुरस्कार व बेकायदेशीरपणे सहकार्य आणि प्रोत्साहन केल्या कारणावरून मनीषा तापडिया आणि तिचे पती मदनलालजी तापडिया या दोघांविरुद्ध नवी मुंबई खारघर पोलीस ठाण्यात 2 एप्रिल 2026 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र , व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई ,आणि पोलीस निरीक्षक किरण कुमार वाघ व पोलीस कर्मचारी या पथकाने केली आहे.



