नवसाला पावणाऱ्या सफाळ्यातील ग्रामदेवी कुर्लाई मातेची जत्रा 7 एप्रिल रोजी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. क्रमांक :7030516640
पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिम गावातील सुप्रसिद्ध ग्रामदेवी कुर्लाई देवीची वार्षिक जत्रा मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणार आहे.या यात्रेचे नियोजन ग्रामदेवी कुर्लाई विश्वस्त मंडळ ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.शेकडो वर्षांपूर्वी कुर्लाई मातेचे वास्तव्य सरतोडी या गावात होते. त्यानंतर कैलासवासी गोविंद रानडे, विठ्ठल घरत, भाऊ पाटील, माधव पाटील,व गोविंद घरत या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सफाळे गावात या मातेच्या मूर्तीची मंदिरात स्थापना करण्यात आली काही काळानंतर जुना मंदिराच्या जागी नवीन मंदिराची स्थापना
करण्यात आल्यापासून यां ग्रामदेवी कुर्लाई मातेच्या मंदिराची यात्रा गेल्या 70 वर्षापासून भक्ती भावाने आणि जल्लोषासह पारंपरिक परंपरा जपत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
या जत्रेच्या निमित्ताने पंचकोशीतील भाविक आणि भक्तांसह राजस्थान, दिल्ली , रामेश्वर या भागातील भक्त देखील या देवीच्या यात्रेला भक्ती भावाने भेट देतात कारण या देवीची चार रुपये आहेत म्हणून ही देवी सफाळ्यामध्ये कुर्लाई माता, राजस्थानमध्ये किरवली देवी, आणि हिमालयात सुवर्ण लंकेश्वरी तर रामेश्वरी येथे कन्याकुमारी या नावाने प्रसिद्ध आहे म्हणून या देवीच्या यात्रेला आणि दर्शनाला पर राज्यातून भाविक भक्तजन आपला नवस पूर्ण करण्यासाठी जत्रेच्या निमित्ताने येतात.



