शहर

सफाळे मांडे शिलटे हद्दीतील नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदु राणी जाखड यांच्या आदेशानुसार मृद व जलसंधारण विभाग पालघर, टाटा मोटर्स व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर तालुक्यातील मांडे, शिलटे व सफाळे येथील नालाखोलीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. वर्षानुवर्ष दगड गोट्यांनी साचलेला नाल्याचे शिलटे येथील नाला अंदाजे 810 मी. व मौजे मांडे येथील 2120 मी. नाल्यावर खोलीकरण करण्याचे काम वरील यंत्रणे मार्फत सुरू करण्यात आले आहे.

नाला खोलीकरण केल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थितीमुळे नाल्या शेजारील शेतकऱ्यांचे होणारे पिकाचे नुकसान अतिवृष्टीच्या वेळी पुरस्थिती निर्माण होऊन मुख्य रस्त्यावर पाणी येऊन होणारे अपघात तसेच गावातील घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे
या दृष्टीने ग्रुप ग्रामपंचायत मांडे विठ्ठलवाडी सरपंच महेंद्र पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे या कामाला मंजुरी मिळवून सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button