शहर

शैक्षणिक विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व- जयसिंह मोहिते पाटील

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज चे मुख्याध्यापक, राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य मा.श्री. प्रताप पाटील हे संस्थेतील विविध शाखेतून ३३ वर्ष ८ महिने ९ दिवस सेवा करून नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत याप्रित्यर्थ त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्ती पाटील सरांचा सहकुटुंब सत्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज चे मार्गदर्शक संचालक मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, शि. प्र. मंडळ, अकलूज चे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील या मान्यवरांच्या हस्ते व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, युवा नेते मा.चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील, मा.श्री.दिपकराव खराडे, पाटील, माजी जि.प सदस्य मा.श्री.सतीशराव माने देशमुख, महर्षी प्रशालेचे सभापती मा.श्री.अॅड.नितीनराव खराडे-पाटील, संस्थेचे सचिव मा.श्री.अभिजित रणवरे, सहसचिव मा.श्री.हर्षवर्धन खराडे-पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

प्रास्ताविकात विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.घंटे सर यांनी पाटील सरांचा जीवन परिचय देऊन त्यांच्या शैक्षणिक सेवेची व कार्याची ओळख करून दिली. पाटील परिवाराचे वतीने मा. बाळदादांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी मनोगतामध्ये कु. प्रेरणा गायकवाड हिने स्वरचित ‘सर’ ही कविता सादर करून पाटील सरांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली. शिक्षक मनोगतातून सौ.सुनीता ठोंबरे मॅडम व श्री. राजेंद्र धोत्रे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर मा. जि. प. सदस्य व वेळापूर शाखेचे सभापती सतीशराव माने -देशमुख यांनीही सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पैलूचे कौतुक आपल्या भाषणातून केले. मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी पाटील सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे व मुख्याध्यापक पदावर केलेल्या सेवेचे कौतुक केले तसेच संस्थेसाठी, प्रताप क्रीडा मंडळासाठी दिलेल्या योगदानाचे भरभरून कौतुक केले.

यानंतर सत्कारमूर्ती पाटील सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये जीवनामध्ये सहकार महर्षीच्या कार्याची प्रेरणा घेऊनच कार्य केले हे सांगून मोहिते-पाटील परिवाराने, संस्थेने जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पडल्याची पोहोचपावती या स्नेह सत्कारातून मिळाली हे सांगितले. तसेच शैक्षणिक वाटचालीतील विविध प्रसंग व अनुभव याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी सरांच्या सृजनशील व्यक्तिमत्वाचे कौतुक करून संस्थेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमामधून त्यांना दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याचे सांगून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच निवृत्तीनंतर संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची जबाबदारी समर्थपणे स्वीकारावी हे सांगितले. प्रभावी नेतृत्वाचे कौतुक करताना राजकीय क्षेत्रासाठीही आपले व्यक्तिमत्व अनुकूल असून ‘ भावी आमदार’ असा नामोल्लेख केला.

या कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, प्राचार्य बागडे सर, माजी प्राचार्य आबासाहेब देशमुख, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर, विद्यार्थी, मित्रमंडळी, पै पाहुणे, हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पोपट पवार, राजकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमांची सांगता सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताने झाली. शेवटी पाटील सरांच्या वतीने सर्वांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button