पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते डहाणू येथे नवीन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर तालुक्यातील डहाणू पूर्व येथील आशागड,गंजाड, मणिपूर,आगवन,चरी या तलाठी सजा अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी डहाणू आसवे येथे नवीन मंडल अधिकारी तसेच तलाठी कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी पालघर जिल्हाधिकारी श्री.गोविंद बोडके तसेच डहाणू विद्यमान आमदार श्री. विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले.

हे तलाठी कार्यालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय जाधव यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच ही वास्तू लोकसेवेसाठी उभारण्यात आली असून या तलाठी कार्यालयाचा दैनंदिन कारभार पारदर्शक करून जनतेची सेवा करावी अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.
या उद्घाटना प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डहाणू श्रीमती संजीता महापात्र, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख, उपजिल्हाधिकारी रोहन कुवर, उपअभियंता अजय जाधव, प्रकाश धोडी, सरपंच विष्णू गुराडा तसेच शासकीय कर्मचारी, तलाठी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



