डहाणू तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सांगळे लाच स्वीकारताना पालघर ACB दादाराम करांडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड येथील आंबेसरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे वय वर्ष (41 ) यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर अँटीकरप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात अटक करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
(40) वर्षीय इको गाडी चालक मालक तक्रारदार यांच्याकडून ही लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.तक्रारदार यांची इको गाडी या रुग्णालयात भाडेतत्त्वावर आहे.हे भाडे गेले सहा महिन्यापासून थकले होते. हे बिल पास करून दिल्यावर त्या मागचे एकूण कमिशन 35 हजार रुपयांच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी तक्रारदार यांच्या मागे तगादा लावला होता.यावरून इको गाडीच्या मालकाने या वैद्यकीय अधिकाऱ्यांची लेखी तक्रार अँटी करप्शन विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या कार्यालयात केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी डहाणू आशागड चौकाजवळ सापळा रचून तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय सांगळे यांना रंगेहात अटक करून त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सदरची यशस्वी कारवाई शिवराज पाटील – पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, भागवत सोनावणे- अपर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, सुहास शिंदे – अपर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्याचे अँटी करप्शन विभाग प्रमुख पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार नवनाथ भगत, विकास भोये,योगेश धारणे, आकाश लोहारे, प्रकाश दळवी, जितेंद्र गवळे, गीता कहार या पथकाने केली आहे



