शहर

शिवसंघर्ष संस्थेचा शिवजयंती महोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, रजि. (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ३१ जानेवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा सांगता समारोप पालघर जिल्हा परिषद केंद्र शाळा, माकणे (सफाळे) येथे उत्साहात पार पडला.

संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिवजयंती महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. यावेळी आयोजित कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत कुमारी वेदश्री चंद्रशेखर विचारे हिने प्रथम क्रमांक पटकावला, कुमारी कनिष्का लकीचंद शेरे हिला द्वितीय तर कु. चिराग योगेंद्र गोंड याने तृतीय क्रमांक मिळविला.
विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय रावल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश गुडेकर (संस्थापक/अध्यक्ष, सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट), मा. सौ. शीला शिंदे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), परशुराम गावड (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना) यांच्यासह मुख्याध्यापक विजय रावल सौ. नैना वायकर, सौ. वृषाली रावल (सहाय्यक शिक्षिका) उपस्थित होते. तसेच संस्थेच्या सचिव सौ. प्रीती गुरव, खजिनदार स्वप्नील गोसावी, सदस्य रोहित बेंडल, अभिजित गोसावी, अविनाश साटले, सौ. प्रांजल खांबल, रुपेश काटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक-अध्यक्ष श्री. मयुर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button