शहर

पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते सफाळ्यातील इशिका पाटीलचा विशेष सन्मान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील विरार येथे १२ ते १६ मार्चदरम्यान आयोजित ‘कोकण विभागीय सरस महोत्सव २०२६’ची इन्स्टाग्राम रीलच्या माध्यमातून प्रभावी प्रसिद्धी केल्याबद्दल सफाळे येथील इन्फ्लुएन्सर इशिका नवीन पाटील हिचा विशेष सन्मान करण्यात आला आहे .पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते सोमवारी झालेल्या समारोप सोहळ्यात तिला प्रशस्तीपत्रक आणि वारली चित्रकला देऊन गौरविण्यात आले.

विरार येथे आयोजित या महोत्सवाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. इशिका पाटील हिने तयार केलेल्या इन्स्टाग्राम रीलमुळे या कार्यक्रमाची माहिती अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचली. तिच्या रीलला दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून त्यामुळे महोत्सवाची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उपक्रम आणि स्थानिक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न महत्त्वाचा ठरला. इशिकाने केलेल्या या कामाची दखल घेत पालघर जिल्हा परिषद प्रशासनाने तिचा सन्मान करून कौतुक केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी इशिकाच्या कामाचे कौतुक करत सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button