शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे नवघर येथील यज्ञेश्वर पाटील हा तरुण गेल्या चार दिवसापासून बेपत्ता

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील (33 )वर्षीय तरुण गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाला असून याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी सफाळे पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी मिसिंग तक्रार दाखल केली आहे.

सफाळे नवघर येथे राहणारे (33) वर्षीय यज्ञेश्वर यशवंत पाटील हे शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी आपल्या नवघर येथील राहत्या घरातून स्वतःच्या दुचाकीवरून सफाळे स्टेशनला जातो असे सांगून निघाले होते.

ते आज-तगायत गेल्या चार दिवसापासून घरी परतले नसून त्यांची फक्त दुचाकी पारगाव ब्रिज खाली शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी सफाळे पोलिसांच्या हाती सापडली असून सदर व्यक्ती बाबत काही एक माहिती प्राप्त झाल्यास सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मांदले यांच्याशी 8369055948 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button