अकलूज पोलिसांच्या वतीने नवीन कायद्याबाबत जनजागृती

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो 99 21 500 780
भारतीय न्यायव्यवस्था अधिक सक्षम व पारदर्शक करण्याकरिता केंद्र सरकारने नवीन कायदे करण्याचा निर्णय घेतला भारतीय दंड संहिता (IPC) ऐवजी भारतीय न्याय संहिता (BNS), फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (CRPC) ऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) व साक्षी पुरावा अधिनियम (IEA) ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम (BSA) हे तीन नवे कायदे लागू करण्यात आल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिले.

नवीन कायद्याने १ जुलैपासून पोलीस न्यायालयाचे कामकाज चालणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच नव्या कायद्यातील शिक्षेचे स्वरूप बालक, महिला, पुरुष, आदी गुन्हेगारांना केल्या जाणाऱ्या शिक्षेचे स्वरूपाची ओळख , महिलांची फसवणूक, सामूहिक गुन्हेगारी, अशा विविध गुन्ह्यांचा समावेशाची माहिती त्यांनी दिली. मोबाईलद्वारे, फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड झाल्यावर काही प्रमाणात दाखल होणारे गुन्हे, कलमामध्ये झालेला बदल त्यांची संपूर्ण माहिती तसेच सौम्य प्रकारच्या शिक्षेत पीडितांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर आरोपीला देखील मूळ प्रवाहात कसे आणता येईल, यासाठी देखील भर देण्यात आला आहे म्हणजे एखाद्या आरोपीला शिक्षा ठोठावत असताना समाजसेवा करावी अशा शिक्षेची तरतूद नवीन कायद्यात करण्यात आली आहे. आरोपीच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून केला गेला असल्याची माहिती देखील त्यांनी समाजात जनजागृती व्हावी यासाठी अकलूज पोलीस ठाणे येथे पत्रकार बांधव, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, यांची बैठक घेऊन माहिती दिली
याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होता.



