सुहाना समीर बागवान याचे D फार्मसीच्या परीक्षेत उज्वल यश…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील बागवान समाजातील उमद व्यक्तिमत्व समीर अमिन बागवान (सर) यांची कन्या असलेल्या सुहाना समीर बागवान याने यंदाच्या वर्षी झालेल्या D फार्मसीच्या पहिल्या वर्षासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत 86.30 टक्के गुण मिळवत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला…

माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे शालेय जीवनातील सहकारी असलेल्या समीर बागवान (सर) यांच्या कन्येने संबंधित परीक्षेत मिळवलेल्या यशाने बागवान समाजाची मान निश्चितच उंचावली असुन सुहाना बागवान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे…

सुहाना बागवान याने सदर परीक्षेत मिळवलेल्या यशाने परंडा,अक्कलकोट,मोहोळ,करकंब,माढा,पंढरपूर,सोलापूर आणि अकलूज येथील सर्व आप्तेष्टांनी आनंद व्यक्त केला…

या वेळी अकलूजच्या मुस्लिम समाजाचे नेते हाजी जमीरभाई चौधरी,बागवान समाजातील “समाज भूषण” भैय्या मांढेकर,राजू मोतीलाल (MM),मनोज पोटे,जावेद बागवान (ईंजी),टाइम्स 9 चे पत्रकार आमीर मोहोळकर यांनी सुहाना बागवान याचे अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या…



