संपादकीय

लोक कलावंत यांच्याविषयीं ममत्व दातृत्व असणारे बाळ दादा

बी.टी.शिवशरण

तमाशा कलेची पंढरी म्हणून जरी नारायणगाव अशी ओळख असली तरी कलावंत यांचे आश्रयदाते लावणी कलावंत तमाशा कलावंत यांचे मायबाप म्हणून अकलूजचे जयसिंह उर्फ बाळ दादा मोहितेपाटील उभ्या महाराष्ट्रात ओळखले जातात त्यांनी अकलूजला राजस्तरीय लावणीनृत्य स्पर्धा घेऊन या कलेला सामाजिक सांस्कृतिक उंची निर्माण करुन दिली

तमाशात जत्रेत उरूस मध्ये मर्यादित स्वरूपात बंदिस्त असलेल्या लावणीला लोक आश्रय व कलावंत यांना वैभव प्रसिद्धी मान सन्मान अर्थकारण प्राप्त करुन दिले अकलूज सहकार उद्योग शैक्षणिक व राजकीय पार्श्वभूमी म्हणून राज्यात अकलूज पॅटर्न म्हणून ओळख आहे मात्र बाळ दादा यांनी लावणीनृत्य स्पर्धा घेउंन लावणीला प्रतिष्ठा तर अकलूजला लावणी कलावंत यांची पंढरी म्हणून ओळख निर्माण करुन दिली

लावणी कशी सादर केली पाहिजे शिस्त नियम साजसशृंगार वाद्य याबाबत कटाक्ष असणारे बाळ दादा यांनी गेली पंचवीस वर्षे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा अत्यंत देखणे नियोजन करुन महाराष्ट्रातील लावणी अभ्यासक दर्दी रसिक प्रेक्षक साहित्यिक समीक्षक मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित कलाकार निर्माते यांची पाऊले अकलूजला वळवली सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग हरिपाठ टाळ मृदूंग भक्तीभावाने लाखो वारकरी विठ्ठल भक्तांची पाऊले पंढरीला आसूसलेली असतात

त्याप्रमाणे अकलूजला जानेवारी महिन्यात राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आसूसलेली असायची टाळ आणि चाळ यांची भक्ती शक्ती आणि लोककलेची महती वाढवणाऱ्या दादांनी केवळ लावणी स्पर्धा एवढ्यापर्यंत आपले लक्ष्य केंद्रित केले नाही तर कलावंत विमा त्यांच्या मुलांचे शिक्षण यासाठी शिष्यवृत्ती वसतिगृह सोय वृद्ध कलावंत यांना विशेष आर्थिक मदत देऊन जे काम शासनाचे आहे ते काम सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोह समितीचे माध्यमातून त्यांनी केले

कलेची जाण कलाकार यांचेविषयी अभिमान व महाराष्ट्राची लोप पावत चाललेली लावणी जोपासून तीला पूर्वीपेक्षा जादा महत्व योगदान देऊन अकलूजचे शिरपेचात मानाचे स्थान मिळवून दिलेच पण आणखी एक अत्यन्त गौरव पूर्ण कामगिरी त्यांच्या हातून झाली त्यामुळे तमाशा लावणी कलावंत यांच्या बाबतीतील आस्था प्रेम आदर ममत्व दातृत्व महाराष्ट्राने पहिले गेल्या आठवड्यात अकलूज शंकर नगर येथे महाशिवरात्री निमित्ताने सालाबादप्रमाणे यात्रा भरली होती

यात्रेत तमाशा दरवर्षी येत असतात यावर्षी लंपी आजाराचे सावट असल्याने जनावरांचा बाजार भरवला गेला नाही त्यामुळे तमाशा रसिक असलेले पशुधनमालक यांची जत्रेत गर्दी नव्हती त्याचा मोठा फटका यात्रेत आलेल्या विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा फडाला बसला अपेक्षा पेक्षा तिकीट विक्री झाली नाही त्यामुळे तमाशा कलेवर पोट असलेल्या पाच पन्नास कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागणार होती

पण ही बाब बाळ दादा यांच्या लक्षात आली महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चे वतीने विठा भाऊ मांग नारायणगावकर यांचे चिरंजीव कैलास नारायणगावकर यांच्या तमाशा फडाला रोख पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दिली हे फार मोठे औदर्य दातृत्व त्यांनी दाखवल्याने त्यांच्या विषयी लोक कलावंत यांच्यात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button