शहर

डहाणू ,वाणगाव, घोलवड, कासा येथे वाहतूक पोलिसांची नाकाबंदी 80 वाहन चालकांवर कारवाई

पालघर जिल्हा प्रतिनिधी.विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्हा पोलीस आणि वाहतूक शाखेतर्फे डहाणू तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आली आहे. दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट,वाहनाची कागदपत्र, हेल्मेट, विमा, पीयूसी प्रमाणपत्र, तसेच वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 80 वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

     डहाणू तालुक्यात झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या डहाणू शहर, वाणगाव, कासा, घोलवड, या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे . या कारवाई मध्ये डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी डहाणू सागर नाका, सरावली, पार नाका, डहाणू स्टेशन येथे नाकाबंदी करून वाहन व वाहन चालकांच्या कागदपत्राची तपासणी करून  26 जणांवर कारवाई केली आहे. 

     तर वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले व उप पोलीस निरीक्षक अल्पेश विसे यांनी चिंचणी बायपास व वाणगाव हद्दीत  तपासणी करून 20 वाहन चालकांना दंड ठोठावला आहे. कासा पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी सीट बेल्ट, विना हेल्मेट, अवैध प्रवासी वाहतूक तसेच दुचाकी वर ट्रिपल सीट अश्या 31 वाहन चालकावर कारवाई केली तर घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस  निरीक्षक रवींद्र पारखे यांनी घोलवड परिसरातील तीन वाहन चालकावर कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button