शहर

ऑल ऑऊट ऑपरेशन दरम्यान दोन वर्षापासून वाॅंन्टेड असलेल्या आरोपीला तलासरी पोलिसांनी केले हत्यारासह अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑल ऑऊट ऑपरेशन राबविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत .या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी तलासरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील पाहिजेत असलेले गुन्ह्यातील आरोपी आणि कायद सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पथक तयार करून नाकाबंदी शोध मोहीम सुरू केली असताना.

तलासरी डोंगरी पाटीलपाडा या भागात एक इसम सिल्व्हर रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत संशयास्पद दिसून आला या गाडीला पोलीसांनी हात दाखवून थांबण्यासाठी इशारा केला असताना गाडी चालकाने पोलिसांना पाहून गाडी न थांबता पुढे निघून गेला. या गाडीचा पोलीसांनी पाठलाग करून गाडी थांबवली. व गाडी चालकाची अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव वनज्या उर्फ बन्सी बोंड वय वर्ष (34) राहणार डोंगरी पाटीलपाडा तलासरी जिल्हा पालघर असे सांगितले.

हा इसम हा तलासरी पोलीस ठाणे येथील गुन्हा रजि. नंबर 193 /2019 भारतीय दंड विधान संविधान कलम. 553,332,504,506, 34 मधील पाहिजे असलेला आरोपी असून तो 2 वर्षापासून फरार होता. सदर आरोपी व गाडीची झडती घेतली असताना त्याच्याकडे एक पिस्टल व मॅगझीन मध्ये दोन जिवंत राऊंड तसेच एक बनावटी लोखंडी पिस्टल,पाच मोबाईल मिळून आले. सदर मिळालेल्या मुद्देमाला सह बारा लाख 32 हजार 700 रुपयांची स्काॅर्पीओ गाडी सह पोलिसांनी आरोपीला जेर बंद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button