गणपती बाप्पांच्या विसर्जनादरम्यान झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प…. समाज कार्यकर्त्यांचा पुढाकार तर तर पालघर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
दीड दिवसाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनादरम्यान पालघर जिल्ह्यातील केळवा दांडाखाडी तिघरे गावातील नेम रस्त्यावर वादळी पावसामुळे पडलेल्या झाडामुळे हा रस्ता संपूर्ण बंद झाला होता .या रस्त्यादरम्यान अडकलेल्या वाहतूकदार प्रवासी व भाविकांना त्वरित मदत कार्य करण्यासाठी तिघरे गावचे सरपंच विनोद मोरे उपसरपंच प्रभाकर किणी आणि सचिन किणी यांनी सामाजिक कार्यकर्ते तसेच विळंगी गावचे उपसरपंच चेतन पाटील यांना ही समस्या सांगितल्यावर त्यांनी त्वरित विराथन खुर्द येथील रुपेश घरत यांच्या सहकार्याने एक जेसीबी मशीन आणि लागणारे मदत साहित्य पाठवून गावातील सामाजिक कार्यकर्ते मयुर किणी,नैतिक पाटील,अनिकेत किणी आशिष किणी, निखिल किणी, मनीष किणी, साहिल पाटील व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भर रस्त्यात पडलेले हे झाड रस्त्यावरून हटवून प्रवासी वाहतूकदार व भाविकांना हा रस्ता अवघ्या एक तासात मोकळा करून दिला .

पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता किंवा परिसरात झाड पडले असेल तर झाडाची सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे व रस्ता मोकळा करणे हे प्रथम कर्तव्य असताना देखील पालघर बांधकाम विभागाचे अधिकारी आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवत असल्यामुळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची ही कामे करत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि उपसरपंच विळंगी चेतन पाटील




