पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील वैतरणा नदीत जीआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची बोट बुडून कर्मचारी बेपत्ता
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीपत्रातील डोलीव वैतीपाडा गावाच्या हद्दीत जीआर इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीची बोट सोमवारी सकाळी 8:00
वाजता पाण्यात बुडाल्यामुळे या बोटीतील 23 कामगारांपैकी 2 कामगार वैतरणा नदीत बेपत्ता झाले असून 21 कामगारांना या बोटीतून सुखरूपपणे वाचवण्यात स्थानिक नागरिकांना व जीआर इन्फ्रास्ट्रक्चरच्या कर्मचाऱ्यांना यश आले असून 2 कर्मचाऱ्यांसह ही बोट देखील समुद्रतलाखाली बेपत्ता झाली आहे.
वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणारे कामगार मजूर घेऊन जाणारी जी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनीची बोट सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8:00 वाजता पालघर येथील वैतरणा नदीतून डोलीव वैतीपाडा हद्दीतून नवघर येथे जात असताना डोलीव वैतीपाडा नदीपत्राच्या गावाच्या हद्दीत ही बोट बुडाल्यामुळे या बोटीतील 23 कामगार मजूर या बोटीमध्ये अडकले होत. या 23 कामगारांपैकी 21 कामगारांना सुखरूपपणे वाचवण्यात स्थानिक नागरिक व जीआर इन्फ्रास्ट्रक्चरच्या कर्मचाऱ्यांना यश आले असून 2 कामगारांसह ही बोट देखील वैतरणा नदीपत्रात बेपत्ता झाली आहे.
घटनास्थळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, व केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात ट्रंक या नावाच्या बोटीचे मालक राहुल कुमार मिश्रा यांच्यावर केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी दरम्यान दोषी आढळणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस अधिक तपास करत आहेत.