जोया तहेरीम आणि मोहम्मद वसीम यांचा साखरपुडा थाटामाटात संपन्न…
आमीर मोहोळकर प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज मो.नं.9890299499
इंदापूर चे प्रसिद्ध उद्योगपती हाजी कय्युमभाई इमामभाई बागवान (अलंकार ग्रुप) यांची नात आणि हाजी अर्शदभाई हाजी कय्युमभाई बागवान यांची सुकन्या “जोया तहेरीम” याचा साखरपुडा कुरुंदवाड जि सांगली येथील प्रगतशील शेतकरी आणि उद्योगपती असलेले हाजी मुबारकभाई (फरदिन) हाजी गुलाबभाई बागवान यांचे चि “मोहम्मद वसीम” यांच्या बरोबर इंदापूर येथील “वाघ मल्टीफंक्शन हॉल” येथे सोमवार दि 20/11/”23 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला…
साखरपुड्या साठी आलेल्या सर्व आप्तेष्टांचे “अलंकार ग्रुप” च्या वतीने मानाचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले…
गोरज मुहूर्तावर संपन्न झालेल्या साखरपुड्या प्रसंगी भविष्यकाळातील या वधु वरांना शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद देण्यासाठी इंदापूर शहर बागवान जमातीच्या सर्व सदस्या सह व्यापारी,मित्र,आणि कुरुंदवाड, मिरज, सांगली,बारामती,अकलूज,अक्कलकोट,सोलापूर येथील पाहुणे रावळे मोठ्या प्रमाणात हजर होती…
सदर च्या साखरपुड्या चे “परफेक्ट” नियोजन हाजी शोहेब हाजी कय्युमभाई बागवान उर्फ बबलु (मामा) आणि “अलंकार ग्रुप” इंदापूर च्या सर्व सदस्यांनी केले,सरते शेवटी गुलबर्गा येथील शाही आचाऱ्याने बनवलेल्या मटन आचार,मटन बिर्याणी,रुमाली रोटी आणि निवडक पाहुण्यांसाठी केलेल्या शाकाहारी जेवणासह स्वीट डिश वर यथेच्छ ताव मारत सर्वांनी रजा घेतली…
कायम स्मरणात राहील असा “माशअल्लाह” साखरपुड्या चा कार्यक्रम झाल्याने आणि आलेल्या प्रत्येक घटकाने बागवान परिवार व “अलंकार ग्रुप” वर शुभेच्छा चा वर्षाव करत आभार व्यक्त केले…