महागांव पत्रकार संघाच्या उपोषणास मराठा सेवासंघाचा पाठिंबा
प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
महागांव-आज सोमवार रोजी पासून महागाव येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ चालू करण्यात यावे या विषयी महागांव पत्रकार महासंघा तर्फे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून महागांव येथिल ग्रामीण रुग्णालयाची ईमारत लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत ताटकळत उभि आहे.
शुल्क कारणास्तव हे रुग्णालय धुळखात पडले असून याचा तालुक्यातील जनतेस कूठल्याच प्रकारे उपयोग होत नसल्याने महागांव तालुका महा पत्रकार संघाने त्वरीत चालु करण्यासाठी लेखी तक्रार दिली असता त्या वर कुठलीही कार्यवाही संबंधित प्रशासनाने केली नसल्याने आज उपोषण थाटले आहे.
हे उपोषण तालुक्यातील जनतेच्या हितोपयोगी असल्यामुळे या उपोषणाला मराठा सेवा संघ महागाव वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष उदय नरवाडे उपाध्यक्ष अवि पाटील नरवाडे अमोल जी जगताप सचिव व डॉक्टर शिंदे साहेब पंकज देशमुख रमेश धावडकर श्रीकांत देशमुख विठ्ठल वाघमारे आदी उपस्थित होते