आता यापुढे त्यांना महत्व देणार नाही, मनोज जरांगे यांनी एका वाक्यात विषय संपवला
सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007 93 2121
सांगली : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली. अंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार परिषदेत त्यांनी जरांगेवर सडकून टीका केली.
भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. ‘मी स्व-कष्टाचे खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’, अशी जहरी टीका त्यांनी केली. पण भुजबळांची भाषा खालच्या पातळीची असल्याचा आरोप करत त्यांचे वय झाल्याचा पलटवार जरांगे यांनी केला. त्यांना राज्यातील वातावरण बिघडवायचे असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. यापुढे मराठा समाज भुजबळांना महत्व देणारा नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय संपवला.
भुजबळांचे आता वय झाले आहे. त्यामुळे ते अशी टीका करत असल्याचा टोला जरांगे यांनी हाणला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणारच, असे ते म्हणाले. भुजबळ यांना मी मुरब्बी नेता समजत होतो. पण त्यांची वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीची आहेत. मराठा त्यांचा दर्जा घसरु देणार नाही. आपले पण शिक्षण झाले आहे. त्यामुळे काय बोलावे आणि आरक्षणाच्या मुद्यावर काय मांडावे हे कळते असे त्यांनी स्पष्ट केले.
सांगली येथील जाहीर सभेत जरांगे यांनी भुजबळांवर थेट टीका करणे टाळले. त्यांनी अनेक जण मराठा आरक्षणाविरोधात एकत्र आल्याचे सूर आळवला. पण माध्यमांनी त्यांना भुजबळांनी केलेल्या टीकेवर बोलते केले. त्यावेळी जरांगे यांनी भुजबळांचे आता वय झाले असा टोला त्यांनी हाणला. मराठे त्यांना महत्व देणार नाहीत असे ते म्हणाले. दंगली घडवण्याची भाषा करु नये. आम्हाला वातावरण खराब करायचे नाही, असे त्यांनी सांगितले. आमच्या शेपटावर पाय देऊ नका, नाही तर मराठा काय करु शकतो हे दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. मराठा समाजाचे पुरावे उपलब्ध होत आहे. त्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली