हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयकुमार कांबळे, तर उपाध्यक्षपदी युसुफ शेख
करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी करमाळयातील जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी उपाध्यक्षपदी युसूफ शेख यांचीही निवड करण्यात आली आहे.
मोहल्ला गल्ली येथे आयोजित बैठकीत जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तौफिक शेख हे होते.
यावेळी साहिल बेग, आरिफ खान, झिशान कबीर, कलीम शेख, झिशान खान, नवाज बेग, हुजेब शेख, नदीम शेख, उमेर शेख, अदर शेख, बिलाल शेख आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी समितीच्या मिरवणूक प्रमुख पदी मतीन बागवान तर मिरवणूक उपप्रमुख पदी पैलवान समीर शेख, असीम बेग यांचीही निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी साबीर शेख, सचिव पदी आरबाज पठाण यांची निवड करण्यात आली . तर संयोजन समितीमध्ये अमिन बेग ,साहिल बेग, कादर शेख, बिलाल शेख, निहाल शेख, फैजान शेख, अरमान पठाण यांची निवड करण्यात आली.
पैगंबर जयंतीनिमित्त करमाळ्यात विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी खाटीक गल्ली येथे सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 22 नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबरोबरच करमाळा येथील देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेत तसेच मदरसा फैजुलकुरान येथे फळे व साहित्य वाटपाचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उत्सव समितीचे नूतन अध्यक्ष जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांनी केले आहे. यावेळी बासीत शिकलकर, फजल शेख सद्दाम सय्यद, अल्ताफ दारूवाले, जोयान सय्यद, अमन बॉस ,जमीर मुलानी, फिरोज पठाण, मुनाज शेख, राजू शेख, रेहान शेख, शोयब बेग, राहील शेख, सोहेल शेख, अनिस बेग, अरमान पठाण आदी कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. यावेळी
सर्वांचे स्वागत समीर शेख, साबीर शेख , अफताब पठाण यांनी केले.सर्वांचे आभार तौफिक शेख यांनी मानले.