शहर

सफाळे माकुणसार ग्रामपंचायत हद्दीत मेन पाईपलाईन फुटल्यामुळे रोज हजारो लिटर पाणी जाते वाया.. गावकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे माकुणसार ग्रामपंचायत हद्दीत भर रस्त्यात मेन रोडवर मसाला रेस्टॉरंट व एस-के-पाटील विद्यामंदिर शाळेजवळ पिण्याच्या पाण्याची मेन पाईपलाईन गेल्या आठ महिन्यापासून फुटून नादुरुस्त झाल्यामुळे या पाईपलाईन मधील हजारो लाखो लिटर पिण्याचे पाणी रोज वाया जात आहे.

हे पाणी या मेन रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी गेल्या आठ महिन्यापासून साचल्यामुळे या पाण्यात जीवजंतू व डासांची पैदास झाली आहे.यामुळे गावात रोगराई निर्माण होऊन जीवित हानी होऊ शकते. याबाबत या ग्रामपंचायतीने पालघर पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी देऊन देखील पालघर पाणीपुरवठा विभाग या ज्वलंत बाबीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे.

या साचलेल्या दूषित पाण्याचा बंदोबस्त व फुटलेली पाईपलाईन येत्या आठ दिवसात दुरुस्त न केल्यास शिवसेना उपतालुकाप्रमुख नागेश वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली माकुणसार येथील ग्रामस्थ आंदोलन पुकारतील असा इशारा पालघर पाणीपुरवठा विभागाला शिवसेना उपतालुकाप्रमुख नागेश वर्तक यांच्याकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button