विशेष
शिवजयंती निमित्त पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सव उत्साहात संपन्न
बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन राजमुद्रा प्रतिष्ठान, क्रिकेट प्रेमी व समस्त ग्रामस्त पिंपरी बु. यांच्यावतीने लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणुक गावातून काढण्यात आली. भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन तेजस शरद बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या वतीने आयोजित स्नेह भोजनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सव दोन दिवस आयोजन लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालय, पिंपरी बु. यांच्या प्रांगणात करण्यात आला.
शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सवात चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवपार्वती इंग्लिश मिडीयम स्कूल नरसिंहपूर, माध्यमिक विद्यालय गिरवी, लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडलकरवस्ती व पिंपरी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या कलागुणांचा अविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास आव्हाड व सृष्टी पवार यांनी केले.
राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते यांनी काॅमेडी मिक्स गाणे, ज्युनिअर इंदोरीकर महाराजांचे समाजप्रबोधन करणारे काॅमेडी किर्तन, ऋग्वेद सुतार यांचे देशभक्तीपर गीत, गौरी कांबळे व वैष्णवी वाघमारे यांची बहारदार लावणी तसेच सहभागी सर्वच कलाकारांनी आपल्या कलेतून सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले. दोन दिवसात जवळपास ८० ते ९० गाणी घेण्यात आली. प्रेक्षकांनी त्यांच्या कलेला दाद देत सर्वच कलाकारांसाठी जवळपास ७८ हजार रूपयांची बक्षिसी दिली.
सदर कार्यक्रमास सहकार्य करणारे पत्रकार शौकत तांबोळी, बाळासाहेब सुतार, मोहंमद कैफ तांबोळी, मंडप व डेकोरेशन, साउंड सिस्टीमसाठी टिंकू ढवळसकर, डान्स टिचर अक्षय शिंदे, उत्कृष्ट निवेदक कालीदास आव्हाड, श्रृष्टी सुनिल पवार आदिंचा राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.