आरोग्य

लुमेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न, २५० जणांची तपासणी तर २२५ जणांचे एक्सरे काढण्यात आले.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी

ग्रामपंचायत लुमेवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा व आरोग्य उपकेंद्र सराटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मधुमेह तपासणी (शुगर), रक्त दाब तपासणी (बी पी), सामान्य आरोग्य तपासणी आणी औषध उपचार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व समुपदेशन, रक्त तपासणी, छातीचा एक्सरे तपासण्या करण्यात आले.

लुमेवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सदर तपासणी शिबिर घेण्यात आले. सर्व तपासणी मोफत घेण्यात आले. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ताटे, डॉ. ज्ञानेश्वर भाहिगावकर, सहदेव मोहीते, वरीष्ठ क्षयरोग परीवेक्षक, रणजीत खेडकर, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा परीवेक्षक, सागर शिंदे क्ष-किरण तंत्रज्ञ, श्रीमती सुनिता पांढरे, आरोग्य सहाय्यिका, चिंतामणी गायकवाड, महालॅब प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी ग्रामस्थांच्या तपासण्या केल्या. त्यांना आशासेविका रेशमा सय्यद, बशीरा शेख, जगदाळे यांनी मदत केली.

सदर तपासणी शिबीराचे १५० महिला व १०० पुरुषांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वयोवृद्ध ७५, लहान बालके १० जणांची तपासणी करण्यात आली. तर २२५ लोकांची एक्स-रे काढण्यात आले. तपासणी मध्ये अनेक ग्रामस्थांना ॵषध गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शिबीराला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला.
सदर तपासणी शिबीराचे आयोजन करून ते यशस्वी पुणे पार पाडणारे समुदाय अधिकारी श्रीमती शुभांगी चत्रुभुज चाळक, आरोग्य सेविका श्रीमती श्रीकव्हर हरीदास मायंदे, आरोग्य सेवक इब्राहिम मकबुलशा मकानदार, अर्धवेळ स्त्री परिचर स्वाती दादा खरात, आशासेविका पुजा अंबादास जगदाळे, रेश्मा आलम सय्यद, सुनिता प्रमोद जगदाळे, बशीरा शाबान शेख आदिंनी परीश्रम घेतले. तर सरपंच पोपट जगताप, माजी सरपंच कमाल जमादार, उपसरपंच कोकाटे, सुनिल जगताप आदिंचेही सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button