अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस कोर्टी येथील ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
टाइम्स 9 मराठी न्युज
अकलूज : सोलापूर जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालयात खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोर्टी (ता.करमाळा) येथील ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालयात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत हार फुले या खर्चाला फाटा देत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने ओंकार कदम या मुलाच्या हस्ते केक कापून व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रोहित बागडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमची संस्था विनाअनुदानित असल्यामूळे आमच्या संस्थेमध्ये एकूण मुलांची सांख्य 18 असून सर्वांसाठी एक दिवसाला 500 लिटर लागणारे पाणी तसेच संस्थेची स्वतःची पाण्याची बोर नसल्यामूळे होणारे हाल व टँकरने पाणी विकत घ्यायचे म्हटले तरी पाणी विकत मिळत नाही त्यामूळे पाण्याअभावी येत्या 4 महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्या पर्यंत पाणी न मिळाल्यास मुलांचे होणारे हाल यांचा विचार करून करमाळा तालुक्यातील नेते मंडळी व जनतेने पाण्याचे सहकार्य करावे असे आवाहन बागडे यांनी केले.
यावेळी मोहिते पाटील समर्थक प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे, कुर्डुवाडी शहर सचिव संदिप भागवत,आझाद शेख, नवनाथ (सर ) साळवे, अतुल चव्हाण, शशिकांत गायकवाड, अमोल वायदंडे, संस्थापक अध्यक्षा श्रीमती जयश्री लक्ष्मण बागडे, मोहन तळेकर, मोहित बागडे, रोहित बागडे सौ स्वाती झाकणे, दिलीप माने आदी उपस्थित होते.