महाराष्ट्र

शिवसेना निष्ठावंत आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांची तुळजापूर ते धाराशिव पदयाञेचे आयोजन.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी नुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करणारे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अशा संकटाच्या वेळी खंबीरपणे उभे राहणारे आपल्या जिल्ह्याची मुलुख मैदानी तोफ शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठावंत शिवसैनिकांची तुळजापूर ते धाराशिव पायी वारी शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी नऊ वाजता तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथून निघणार आहे.

   संपूर्ण  महाराष्ट्राने गद्दारांची गद्दारी पाहिली पण

या निष्ठावंतांची निष्ठाही अवघ्या जगाने पाहिली.ज्या शिवसेनेने उद्धवसाहेबांने टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता विश्वासार्हता टिकवत आमदार साहेब कैलास दादा पाटील यांनी जी कडवट भावना ठेवून अपार कष्ट घेऊन
गुंड प्रवृत्तीला लाथ मारून उद्धव साहेबां प्रती निष्ठा दाखवून दिली.
त्याबद्दल दादांच महाराष्ट्रभर कौतुक केलं जातंय.त्यांच्याच वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 25 फेब्रुवारी2023 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तुळजापूर ते धाराशिव इथपर्यंत निष्ठावंत शिवसैनिकांची पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शिवसैनिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
सिद्रामप्पा कारभारी
9021583834

        बबन भोसले
      9370911825

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button