विक्रमगड तालुक्यात पुन्हा पावसाचे थैमान–शेतकरी मेटाकुटीला

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -8177805134
भर दिवाळीत विक्रमगड तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेत असताना सुद्धा शेतकरी तक धरून उभा होता. परंतु दिवाळीत थैमान घालून पाऊस थमला नाही. पुन्हा त्याने दिपावली नंतर दिनांक २५/२६/२७ ऑक्टोंबर २०२५ या तीन दिवसात पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी वर्गाचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्व सूत्र आहे. कर्ज काढून शेती गहाण ठेवून सहकार्य संस्थेच्या माध्यमातून शेती सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी पीक कर्ज काढले आहे. शेतीचे उत्पन्न आज मितीस ४०% सुद्धा शेतकरी वर्गा च्या हातात येणार नाही. काढलेले कर्ज कश्या प्रकारे भरणार, घरी काय ठेवणार, मुलांच्या शिक्षणाचे काय, बाकी साकी कुठून भरणार, वर्षभर काय खाणार ही समस्या लहान पासून मोठ्या शेतकरी वर्गास भेडसावीत आहे. भात पीका बरोबर उडीद, नागली, तुर, वरई, खुरासानी हे पीक देखील वाया गेले आहे. या करिता शासनाने ओला दुष्काळाचे निकष लावून थकीत पीक कर्ज व चालू वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करून आश्वासना प्रमाणे दिलेला शब्द खरा करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा/कोरा/कोरा करावा. व बोजा रहित सातबारा पुन्हा शेतकरी वर्गाच्या हाती द्यावा.
विक्रमगड या तालुक्यात एकूण ११ प्राथमिक सहकारी संस्था शेतकरी वर्गा करिता काम करीत आहेत. सदर च्या सर्व कर्ज वाटप करणाऱ्या संस्था पूर्णतः जिल्हा बँकेच्या थकीत यादीमध्ये आहेत. त्यांची थकीत बाकी अंदाजे १० ते १२ कोटीच्या आसपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी वर्गाच्या होतकरू मुलांनी काही उद्योग धंदा करावयाचे ठरविले तर संस्था थकीत असल्याने बँका कर्ज वाटप करण्यास पुढे येत नाही. पर्यायाने स्वतः शेतकरी व त्यांची मुले यांचे भविष्य कठीण होणार आहे. तेव्हा मायबाप शासनाने वरील विषयांचा घांभिर्याने विचार करावा अशी उघड चर्चा तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्ग करत आहे. एक बाजूला निसर्ग साथ देत नाही दुसऱ्या बाजूला शासन कर्ज माफी देण्याचा विचार करीत नाही. अशी परिस्थिती या वर्षी निसर्गाने निर्माण केली आहे. या परिस्थितीवर एकाच उपाय आहे तो म्हणजे कर्ज माफी शासनाने जाहीर करावी. व तातडीची मदत शेतकरी वर्गास देण्यात यावी अशी एकमुखी मागणी विक्रमगड तालुक्यांतील शेतकरी घनःश्याम आळशी यांनी केली आहे.



