शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार रामभाऊ सातपुते निधी मंजुरीसाठी प्रयत्नशील; अशोका चौक ते कर्मवीर चौक रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या पटलावर — महेश शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा फळाला

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज :अकलूज शहरातील अशोका चौक ते कर्मवीर चौक हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा मागण्या करूनही रस्त्याचे काम होत नव्हते, कारण रस्ता नेमका कोणत्या विभागाच्या ताब्यात आहे हेच स्पष्ट नव्हते.

या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेश केशव शिंदे यांनी सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात वर्ग करण्यात आला.

या कामात भाजप नेते सुजयभैय्या माने पाटील यांचीही साथ लाभली. दोघांच्या प्रयत्नांमुळे हा विषय माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून पालकमंत्री आदरणीय जयकुमार (जया भाऊ) गोरे यांच्याकडे सादर करण्यात आला.

सदर रस्त्याचे काम पालकमंत्री निधीतून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, जयकुमार गोरे आणि रामभाऊ सातपुते हे निधी मंजुरीसाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच मंजुरी मिळून या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

महेश शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button