शहर

अकलूजच्या विकासाचा नवा अध्याय : अमृत 2.0 आणि सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत भव्य कामांची सुरूवात…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज नगरपरिषद हद्दीमध्ये केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजने अंतर्गत तब्बल ₹211.54 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाला आहे.या अंतर्गत पाईप लाईनचे काम जोमाने सुरू असून,शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व नियमित व्हावा यासाठी नवीन ५ पाणीटाक्यांचे भूमिपूजन भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

या पाणी टाक्यांची माहिती खालीलप्रमाणे :

विद्यानगर (क्षमता 2.60 लाख लिटर)
विद्यानगर,सयाजीराजे नगर,गावठाण,मुलाणी वस्ती,संजयनगर,अर्जुननगर,गिरमे हॉटेल परिसर,अहिल्यानगर,मोरे वस्ती,पंचशीलनगर,तोरस्कर वस्ती येथे नियमित पाणीपुरवठा होणार.

शिवकीर्तीनगर (क्षमता 3.45 लाख लिटर)
शिवाजीनगर १,शिवाजीनगर २,शिवकीर्तीनगर,शंकरराव मोहिते महाविद्यालय पाठीमागील परिसर,महात्मा फुले नगर,साई पार्क,संत सावता माळी मंदिर परिसर,भारत फुले वस्ती,दत्तनगर,शांतीनगर,कुलकर्णी प्लॉट,भवानीनगर,पटेल कॉलनी,फुले वस्ती.

जगतापवस्ती पंचवटी (क्षमता 50 हजार लिटर)
जगतापवस्ती,पंचवटी,छत्रपती संभाजीनगर, पांढरे वस्ती,नवले वस्ती,हनुमाननगर,ठवरे प्लॉट.

राऊतनगर (क्षमता 1.90 लाख लिटर)
राऊतनगर,जयशंकरनगर,निरामाईनगर,संत नरहरी नगर, शिवकृपा कॉलनी,नंदकुमार माने पाटील नगर,बोहरी वसाहत,के. एल. गिरमे प्लॉट,पवार वस्ती,बोरावके वस्ती.

महावीर पथ (क्षमता 14.45 लाख लिटर)
महावीर पथ,गुळवेनगर,सहकारनगर,लक्ष्मीनारायणनगर,औदुंबरनगर,जुने बसस्थानक पाठीमागील परिसर,इरिगेशन कॉलनी,हांगे चाळ परिसर,सुजयनगर,फुलेनगर,ताम्हाणेनगर — या सर्व भागात होणार नियमित पाणीपुरवठा!

सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत रस्ते बांधकामासाठी ₹120 कोटींचा निधी मंजूर!
पहिल्या टप्प्यातील चार प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन आज पार पडले

भारत फुले प्लॉट अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व गटर बांधकाम शंकरराव मोहिते महाविद्यालय पाठीमागे फुले वस्ती — सिमेंट काँक्रीट रस्ता व गटर बांधकाम, माळेवाडी सोहम बिल्डिंग ते ओढ्या पर्यंत — सिमेंट काँक्रीट रस्ता व गटर बांधकाम, बारभाई गट — जुना महाळुंग रस्ता ते नवीन महाळुंग रस्ता सिमेंट काँक्रीट रस्ता व गटर बांधकाम

यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील,किशोरसिंह माने पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील,क्रांतिसिंह माने पाटील,विश्वतेजसिंह मोहिते पाटील,सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते देखील विकासकामांचे भूमिपूजन झाले.

या वेळी अकलूज शहरातील आजी-माजी सरपंच,भावी नगरसेवक,विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button