क्राईम

​सोलापूर ग्रामीण हद्दपार! पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची मोठी कारवाई; अकलुज येथील ६ गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अतुल कुलकर्णी,पोलीस अधीक्षक,साहेब सोलापूर ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ५५ अन्वये अकलुज पोलीस ठाणे,सोलापूर ग्रामीण हद्दीतील ०६ इसमांना सोलापूर जिल्हयातून ०६ महिण्याकरिता हद्दपार केले आहे…

पोलीस निरीक्षक,निरज उबाळे,साहेब अकलुज पोलीस ठाणे यांनी टोळीला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव मा.पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण यांचेकडे सादर केला होता…

हि टोळी अकलुज (ता. माळशिरस) येथील असून,टोळी प्रमुख व सदस्यांवर अकलुज,सातारा शहर (जि. सातारा), आणि श्रीरामपुर (जि. अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे शरीराविषयी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल होते…

टोळीने अकलुज शहरात बळजोरी करून दहशत निर्माण करणे,शरिराविषयी गंभीर गुन्हे,विनयभंगाचे गुन्हे,शेतकऱ्यांची जनावरे घेऊन पैसे न देता आर्थिक फसवणूक करणे,इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे आणि मारामारीचे गुन्हे करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते…

या टोळीने संघटीत रित्या एकत्र येवून किंवा स्वतंत्ररित्या गुन्हे करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवले होते आणि दहशत निर्माण केली होती…

हद्दपार केलेले इसम (टोळी प्रमुख व सदस्य) खालील प्रमाणे

१) करण अभिमान उर्फ अभिमन्य पवार (टोळी प्रमुख),रा. जुना बाजार तळ,अकलूज ता. माळशिरस

२) बंटी उर्फ अभिषेक अभिमान उर्फ अभिमन्य पवार (टोळी सदस्य) रा.जुना बाजार तळ,अकलूज ता.माळशिरस

३) विठठल उर्फ ओंकार सोमनाथ यादव (टोळी सदस्य) रा.अकलुज,ता.माळशिरस

४) सागर अतुल पावसे (टोळी सदस्य) रा.अकलुज ता.माळशिरस

५) विजय शंकर नायडु (टोळी सदस्य) रा.संग्रामनगर ता.माळशिरस

६) आयान ख्वाजा तांबोळी (टोळी सदस्य) रा.संग्रामनगर,ता.माळशिरस

पोलीस प्रशासनाचे आवाहन व महत्त्वाची सूचना…

सदर प्रस्तावाची सुनावणी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री.अतुल कुलकर्णी साहेब यांच्या समक्ष झाली असून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,नमूद हद्दपार केलेले इसम त्यांना हद्दपार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ संबंधित पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावी.भविष्यात देखील दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांविरुद्ध अभिलेख तयार करण्यात आले असून त्यांचे विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येणार आहे,अशी माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे साहेब यांनी दिली…

स्थळ :- अकलुज पोलीस ठाणे
दिनांक: २१/१०/२०२५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button