शहर

“सुप्रीम”आदेशाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी होणार सुरू

🎯 अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीकडे मात्र सबंध महाराष्ट्राचे लक्ष…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

टाइम्स 9 न्यूज च्या परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे…

मित्रांनो,
सबंध महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत पार पाडा,असा “सुप्रीम” आदेश असून त्या अनुषंगाने निवडणूक आयोग,महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासन कामाला लागले आहे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ सात आठ वर्षांनी होत आहेत,या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या महानगर पालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समित्या आणि नगर परिषदेचे संपूर्ण कामकाज हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चालवले…

याचे काय परिणाम झाले हे आपण सर्वांनी पाहिले,लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले असे किती तरी विकासात्मक कामांपासून महाराष्ट्राची जनता दूर राहिली म्हणूनच आता ती वेळ अगदी समीप येऊन ठेपली आहे…

गावं गाड्याचा विचार केला तर जिथे ग्रामपंचायती होत्या तिथे काही ठिकाणी नगर परिषदेच्या रूपाने आता आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे,2021 पर्यंत अकलूज सारख्या आशिया खंडात अग्रेसर असणाऱ्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदे मध्ये रूपांतर करण्यात आले…

या मध्ये सबंध अकलूजकरांना काहीं काळ उपोषण,आंदोलन देखील करावे लागले आणि सरते शेवटी 99 वर्षाची आपली ग्रामपंचायत विसर्जन होऊन अकलूज नगर परिषद अकलूज झाली असून महत्त्वाची बाब म्हणजे अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती मध्ये अनुसूचित जाती (SC) महिला साठी आरक्षण जाहीर झाले असल्याने अकलूज नगर परिषदेची पहिली महिला “नगराध्यक्षा” कोण होणार… या कडे हि सर्वांचे लक्ष लागले आहे…

तमाम अकलूजकर मतदार बंधू आणि भगिनीं हे पहिल्यांदाच नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि हि निवडणूक प्रामुख्याने पक्षीय राजकारणाच्या अनुषंगाने होत असते आणि ती पक्षीयच राजकारणाने व्हावी असे जनतेचे आणि राजकीय जाणकारांचे मत आहे…

या दरम्यान महाराष्ट्रातील भाजपा सोडून अन्य कोणत्याही प्रमुख पक्षाने निवडणूक लढवण्याची भुमिका जाहीर केली नाहीय,दिवाळीच्या नंतर एकूण सर्वच प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आपआपल्या भुमिका जाहीर करतील,त्या नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल असा हि अंदाज जनतेने आणि राजकीय “प्रकांड” पंडितांनी व्यक्त केलेला दिसत आहे…

त्या साठी आपण थोडे वेट अँड वॉच करण्यात काय हरकत आहे,असे मला तरी वाटत आहे,आपली हक्काच्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक हि पार पडणारच आहे,परंतु आपल्या प्रभागातील “नगरसेवक” हा कसा असावा,याची खूणगाठ देखील आपल्यातील काहींनी बांधून ठेवली असावी हे मात्र तितकेच खरे…

देशातील आणि आशिया खंडातील एक अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून अकलूजने ओळख निर्माण केली होती.अनेक वर्षे सहकार,शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून या गावाने राज्याला दिशा दिली असून आता ९९ वर्षांच्या ग्रामपंचायतीचा इतिहास समाप्त होऊन अकलूज नगर परिषद अस्तित्वात आली आहे.त्यामुळे हि पहिली निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून,अकलूजच्या भविष्याची “दिशा” ठरवणारी ठरणार आहे.विकासाचा हा “अकलूज पॅटर्न” नगर परिषदेच्या माध्यमातून पुढे कसा नेला जातो,यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे…

“सुप्रीम” कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग आता युद्धपातळीवर कामाला लागला आहे.निवडणुकीच्या तयारीतील प्रमुख टप्पे,जसे की नवीन प्रभाग रचना (वार्ड निश्चिती),प्रभागांचे आरक्षण सोडत आणि मतदार याद्या अद्ययावत करणे ही कामे सुरू झाली आहेत,दिवाळीनंतर राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट होईल,तसे हे प्रशासकीय कामकाजही वेगाने पूर्ण केले जाईल.या सर्व घडामोडींवर टाईम्स ९ न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवत राहू…

जाता जाता एवढीच अपेक्षा करतो की,आपल्या प्रभागातील नगरसेवक हा सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि मतदारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारा असावा आणि त्या साठी तो स्वतः शिकल्या सवरलेला असावा हिच माफक अपेक्षा माझ्या सह अकलूज येथील सर्व मतदार बंधू आणि भगिनींची असेल,या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा,प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची राजवट येण्याची ही सुवर्णसंधी आहे.योग्य,पारदर्शक आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाची निवड करणे,हीच खरी “लोकशाही” असणार आहे…

निवडणूकीची ठळक वैशिष्ठे :-

१) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ समीप…

२) अकलूज नगर परिषदेची पहिली निवडणूक: नगरसेवक कसा असावा..?

३) अकलूज नगर परिषदे मध्ये रूपांतर,९९ वर्षांची ग्रामपंचायत अखेर विसर्जित…

४) अकलूजकर पहिल्यांदाच नगर परिषदेच्या मतदानाला सज्ज…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button