माळशिरस मांडवे उपकेंद्रांतर्गत येळीव गावठाण येथील डीपी जळाला; अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चर्चा

टाईम्स ९ मराठी (प्रतिनिधी: महेश मोहिते, मो. ९३०७१२५५९८)
माळशिरस: माळशिरस तालुक्यातील मांडवे उपकेंद्राच्या अखत्यारीतील येळीव (सिंगल फेज) ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण परिसरातील विद्युत रोहित्र (डीपी) मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी जळाला आहे.
या गंभीर समस्येमुळे गावठाण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, या भागात अनेक नागरिकांकडे अद्याप अधिकृत मीटर कनेक्शन नसतानाही हा डीपी जळाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आणि नवीन डीपी बसवण्यासाठी येळीव येथील नागरिक माजी आमदार तसेच विद्यमान आमदारांकडे मदतीसाठी गेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.
या जनरेट केलेल्या समस्येवर वीज वितरण कंपनीचे अधिकारी काय भूमिका घेतात? नागरिकांच्या या प्रयत्नांना अधिकारी दाद देतात की नाही? माजी आमदार आणि विद्यमान आमदारांपैकी या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोण निर्णायक भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रयत्नांमध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीला यश येते, याचे सविस्तर नाव उद्या जाहीर केले जाईल.



