महाराष्ट्र

मोहिते पाटील यांची रीप्लेसमेन्ट बाजार बुणगे होऊ शकतील काय?

ऍड अविनाश टी काले,अकलूज
मो न 9960178213

कांहीं वर्षापासून माळशिरस तालुक्यात एक राजकीय प्रयोग भाजपचे पराभूत उमेदवार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने खेळला जात आहे.आणि तो खेळ म्हणजे माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचा हक्काचा असलेल्या घराण्यातील माणसांना बाजूला करून त्यांना पक्षाची विविध पदे देऊन आणि नेतृत्वाच्या शिखरावर चाढवण्याची हमी देऊन त्यांना घोड्यावर बसवण्यात येत आहे

त्यात अशा अनेक भावकितील सदस्यांचा समावेश आहे , ज्यांना मोहिते पाटील घराण्याने जिल्हा परिषद अध्यक्ष ,पंचायत समिती , विविध कार्यकारी सोसायटी , मार्केट कमिटी अश्या विविध सत्तेच्या जागा दिल्या ,, समाज व्यवस्थेत आपल्या समकक्ष मानाचे आणि आदराचे स्थान दिले ,,
अशी अनेक मंडळी च्या सत्ता महत्वाकांक्षा वाढल्या , त्या सगळ्यांची पूर्तता करणे लोकशाहीत सगळेच शक्य होत नाही , व्यापक राजकीय पाया निर्माण करताना सर्व जाती घटकातील समीकरणे जुळवावी लागतात , यात थोडे पुढे मागे होते .

पण याचा अर्थ त्यांनी त्यांना दुश्मन मानले होते असे नव्हते ,, पण ही बाब जेंव्हा महत्वकांक्षे चां पडदा डोळ्यावर चढतो तेंव्हा भूत काळातील सगळे संबंध , सौदार्हता, नाती ही क्षीण होऊन जातात घरातील माणसांपेक्षा बाहेरचे जवळचे वाटू लागतात , तेच हित चिंतक भासू लागतात , तेंव्हा हा संघर्ष अधिक कडवट भूमिका घेत पुढे सरकत राहतो .

ज्यांची स्वतःची म्हणून कांहीं ही शक्ती नसलेला माणूस फक्त एका राजकीय बदलाचा भाग म्हणून माळशिरस तालुक्यात येतो , आणि सत्तेची कवच कुंडले स्वतः भोवती घेऊन ज्यांनी सत्ताधीश बनवले होते त्यांचेच सत्तेचे वरदान घेऊन त्यांनाच भस्मसात करू पाहणाऱ्या भस्मासुरा चे रुप धारण करतो ,,
ते पाहून प्रत्यक्ष ज्यांनी वरदान देण्याची शक्ती ठेवली ते
भ देवाधीदेव महादेव यांची ही थोडा काळ त्रेधा तिपिट झाली होती ,, तेंव्हा भ विष्णू त्यांच्या मदतीला धावले आणि अश्या नृत्य कलेत त्याला फसवले ज्यातून स्वतःच्या डोक्यावर भस्मासुराचा हात गेल्या आणि शेवटी त्याची राख झाली ,,
माळशिरस तालुक्याच्या राजकीय पटलावर मोहिते पाटील हे आज भ महादेवा सारख्या त्या स्थितीत आहेत ,,

एका बाजूला सर्व राजकीय विरोधकांना सर्व शक्ती निशी सर्व शासकीय दमन यंत्रंनेचा वापर करून त्यांची शक्ती मोडून काढणारी भाजपा ,, आणि दुसऱ्या बाजूने याच सत्तेच्या आशीर्वादाने मद मस्त होत चाललेल्या असुरी शक्तीस आपल्याच घरातील नाते वाईक् यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळत असलेले बळ ,,,पण इथे एक बाब पक्की आहे की मोहिते पाटील यांना कुण्या सोम्या गोम्या ने शक्ती दिलेली नाही , तर गेली सहा/सात दशके या घराण्याने जनतेच्या आर्थिक उन्नती साठी जी संस्थात्मक बांधणी केली , सत्तेच्या माध्यमातून अनेकाचे अनेक प्रश्न मार्गी लावले यातून जो जनाधार आणि जनतेचे प्रेम व समर्थन त्यांना प्राप्त आहे त्याची तुलना फक्त भ विष्णू यांच्या शक्ती सामर्थ्याशी केली जाऊ शकते ,
याच जन शक्ती ने मोहिते पाटील यांना तारले आणि देशाला ही दाखवून दिले की थेट देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी जाहीर सभा घेऊन ही त्यांना हा मतदार तोडता आला नाही ,, तो 2014मध्ये तोडता आला नाही आणि 2024मध्ये ही तोडता आला नाही ,,

आमच्या सारख्या ना ही दुःख आणि वैष्यम्य फक्त याचेच वाटते की परिस्थिती बदलली की माणसे किती झपाट्याने बदलतात याचे दर्शन आम्हाला होते आहे , फक्त पालकमंत्री असलेले ना जय कुमार गोरे हे त्यांना मोहिते पाटील यांच्या पेक्षा मोठे भासू लागले ,, अजून ही आदरणीय विजय दादा आहेत ज्यांना पूर्ण महाराष्ट्रात आदराचे स्थान आहे , कोणताही नेता त्यांचे समोर आज ही अदबीने उभा राहतो , याचे कारण त्या नेत्यात ती संस्कृती आणि आदब होता , वर्तनात शालीनता होती ,,”जो खानदानी रईस होते मिजाज रखते है नर्म अपना”तुम्हारा लेहजा बता रहा है ,, तुम्हारी दौलत नई नई है”तसे नवीन सत्ता धारी बनले की भाषा बदलते , सत्तेचा दर्प वाणी तून उमटतो ,, तो आम्हाला या एक दोन सभा मधून पालकमंत्री यांच्यात आम्हाला दिसला ,,

तलठ्या पासून ते जिल्हाधिकारी व हवालदार ते एस पी पर्यंत फक्त आपली सत्ता आहे आणि या आधारे आम्ही कांहीं ही घडवू शकतो ,, जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे ,, हा दर्प फार टिकाऊ नाही ,,मणिपूर, आसाम पासून लडाख ते पंजाब पर्यंत भाजप ला ज्या जन रोषास सामोरे जावे लागत आहे ते पाहता हा जनक्षोभ फक्त सत्तेच्या बळावर चिरडून टाकणे भाजप साठी बिकट होत असताना आम्ही कायम अंजिक्य आहोत हा भ्रम गाव खेड्यातील माणसात पसरवणे सोपे असले तरी ते शाश्वत नाही ,, याचे कारण आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि इंटरनेट आहे याचे भान कुणी ही विसरू नये हे झाले राष्ट्रीय पातळीवर ,, पण
बाहेरच्या शक्ती आधारे स्वतःच्या हाताच्या बेडक्या फुगवून नसलेले शक्ती प्रदर्शन अंतिमतः त्यांच्या स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरेल

भ गौतम बुद्ध यांनी पराभव कुणाचा होतो हे सांगताना ज्या मार्मिक बाबी सांगितल्या आहेत त्यात या लेखासाठी समर्पक ठरेल असे उदाहरण त्यांनी दिले आहे “आम्ही ही क्षत्रिय आहोत हा भ्रम उराशी बाळगून जे लोक सम्राटांच्या शक्तीला आव्हान देतात त्या लढाईत दुर्बल क्षत्रियांचा नाश अटळ असतो , पराभव नीच्छित असतो .

मोहिते पाटील यांचे आम्ही नातेवाईक आहोत , भावकी आहोत म्हणून आम्ही त्यांचा पराभव करून सत्ताधीश बनू ही स्वप्ने किती खोखली , पोकळ होती हे त्यांना ही लवकरच समजून येईल फक्त सतेच्चा टेकू ने लोकनेते बनता येतं नाही आणि लोकाश्रय ही मिळत नाही हे सत्य लवकरच उजागर होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button