सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांचे आरक्षण जाहीर…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
🎯 नान्नज वडाळा गटामध्ये ओबीसी आरक्षण झाल्याने बळीराम साठे आऊट तर नरखेड गटातून उमेश पाटील निवडणूक लढवण्याची दाट शक्यता…
🎯 कुर्डुतून शिंदे परिवारातील उमेदवार कोण…? या कडे मात्र सोलापूर जिल्ह्याचे लक्ष
🎯 सोलापूर जिल्हा परिषदेवर राहणार कुणाचे वर्चस्व…? या प्रश्नाकडे मात्र अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गटांचे आरक्षण आज जाहीर झाले असून सोलापूर जिल्ह्यातील 68 गटांत आरक्षण सोडतीत अनेकांचे स्वप्न भंगले आहे,तर अनुकूल आरक्षण पडलेल्या अनेकांना आतापासून जिल्हा परिषद सदस्य झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा नान्नज-वडाळा गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांचे शेवटची निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा नरखेड गट सर्वसाधारण राहिल्याने सर्वाधिक चुरस येथे पाहायला मिळू शकते,बळीराम काका साठेंचे स्वप्न भंगले तर तिकडे उमेश पाटलांना पुन्हा संधी मिळेल असे वाटत आहे,कुर्डूत मात्र शिंदे कुटुंबातील उमेदवार कोण असेल..? हा प्रश्न आहे…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात अनेक बड्या नेत्यांचे जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.
माढा तालुक्यातील कुर्डू जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारणसाठी खुला राहिला आहे.तो माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा मतदारसंघ आहे,त्यामुळे शिंदे कुटुंबातील कोण कुर्डूमधून निवडणूक लढविणार याची उत्सुकता आहे.तसेच,शिवाजी सावंत यांचा पारंपारिक मानेगाव गटही खुला राहिला आहे,त्यामुळे शिवाजी सावंत यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत हे या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात…
सोलापूर जिल्ह्यातील तालुका,गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
करमाळा तालुका
पांडे : सर्वसाधारण महिला
वीट : सर्वसाधारण महिला
कोर्टी : सर्वसाधारण महिला
चिखलठाण : सर्वसाधारण
वांगी एक : सर्वसाधारण महिला
केम : ओबीसी महिला
माढा तालुका
भोसरे : सर्वसाधारण महिला
मानेगाव : सर्वसाधारण
उपळाई बुद्रुक : ओबीसी महिला
कुर्डू : सर्वसाधारण
टेंभुर्णी : ओबीसी महिला
बेंबळे : सर्वसाधारण महिला
मोडनिंब : सर्वसाधारण महिला
बार्शी तालुका
उपळाई ठोंगे : ओबीसी
पांगरी : सर्वसाधारण महिला
उपळे दुमाला : ओबीसी महिला
पानगाव : सर्वसाधारण
मालवंडी : सर्वसाधारण महिला
शेळगाव (आर) : सर्वसाधारण महिला
उत्तर सोलापूर
नान्नज : ओबीसी
बीबी दारफळ : सर्वसाधारण
कोंडी : सर्वसाधारण
…………………………………….
मोहोळ
आष्टी : सर्वसाधारण
नरखेड : सर्वसाधारण
कामती बुद्रूक : सर्वसाधारण महिला
पोखरापूर : ओबीसी
पेनूर : सर्वसाधारण
कुरुल : सर्वसाधारण
पंढरपूर तालुका
करकंब : सर्वसाधारण
भोसे : सर्वसाधारण महिला
रोपळे : अनुसूचित जाती महिला
गोपाळपूर : सर्वसाधारण महिला
वाखरी : सर्वसाधारण महिला
भाळवणी : अनुसूचित जाती महिला
टाकळी : अनुसूचित जाती
कासेगाव : ओबीसी
माळशिरस तालुका
दहिगाव : अनुसूचित जाती
मांडवे : सर्वसाधारण
फोंडशिरस : सर्वसाधारण
संग्रामनगर : ओबीसी महिला
माळीनगर : अनुसूचित जाती
बोरगाव : अनुसूचित जाती
वेळापूर : अनुसूचित जाती महिला
निमगाव : ओबीसी महिला
पिलीव : सर्वसाधारण
सांगोला तालुका
महूद बुद्रुक : ओबीसी
एखतपूर : ओबीसी महिला
जवळा : सर्वसाधारण
कडलास : सर्वसाधारण महिला
चोपडी : सर्वसाधारण
कोळा : सर्वसाधारण
घेरडी : ओबीसी महिला
मंगळवेढा तालुका
संत दामाजीनगर : ओबीसी
हुलजंती : सर्वसाधारण महिला
लक्ष्मी दहिवडी : अनुसूचित जाती महिला
भोसे : सर्वसाधारण
……………………………
दक्षिण सोलापूर
बोरामणी : सर्वसाधारण
कुंभारी : ओबीसी महिला
वळसंग : ओबीसी
हत्तूर : सर्वसाधारण महिला
मंद्रूप : सर्वसाधारण महिला
भंडार कवठे : अनुसूचित जमाती महिला
अक्कलकोट तालुका
चपळगाव : सर्वसाधारण महिला
वागदरी : ओबीसी
जेऊर : अनुसुचित जाती
मंगरूळ : अनुसूचित जाती महिला
नागणसूर : सर्वसाधारण
सलगर : ओबीसी
सोलापूर जिल्हा परिषदेत ६८ गटांचे आरक्षण जाहीर झाले…
नान्नज-वडाळा गट ओबीसी साठी राखीव झाल्याने बळीराम साठे यांना उमेदवारी मिळू शकणार नाही…
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील नरखेड गटातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे,नरखेड गट सर्वसाधारण राहिल्याने त्या गटातून तिथे चुरस पाहायला मिळू शकते…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठीची तयारी म्हणून ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे…



