महाराष्ट्र

माढा लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना दाखवली औकात…

🎯 अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी जाब विचारताच तेथून त्यांनी घेतला पाय काढता…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वयंघोषित ओळख असलेले सदाभाऊ खोत हे माढा तालुक्यातील उंदरगाव येथे आले होते.या वेळी अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना बांधावरच अडवून त्यांची “औकात” दाखवली,या मुळे भाजपा प्रणित शेतकरी संघटने मध्ये हाहाकार उडाला असून सदाभाऊ खोत हे नकली नाणे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले….

सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्या वेळी येथील शेतकरी लोकांनी त्यांना अक्षरश पळवून लावले,या वेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांना आपण 2014 च्या लोकसभा निवडणुकी नंतर आत्ताच या भागा मध्ये का आल्याचा जाब देखील विचारला…

काही शेतकऱ्यांनी तर सदाभाऊ खोत यांना तत्कालीन लोकसभा निवडणुकीत या भागातील प्रत्येक गावाने आपल्याला निवडणुकीसाठी लोकवर्गणी देऊन आणि पाच पाच हजार रुपयांच्या नोटांची माळा घातल्या होत्या अशी आठवणच त्यांना करून दिली…

या वेळी बोलताना येथील शेतकऱ्यांनी केवळ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या बंधूनीच तातडीची मदत आम्हाला आत्ता पर्यंत आमच्या जनावरांसाठी चाऱ्याच्या रुपाने पाठवली असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले…

सदाभाऊ खोत यांच्या समोर बोलताना अतिवृष्टीने परेशान झालेल्या शेतकरी असे सुद्धा म्हणाले की,या भागात पाण्याची पातळी वाढत आहे आणि अशा परिस्थिती मध्ये आम्हला राजकारण करण्यात रस उरलेला नसून आपण फक्त फोटो व व्हिडिओ सेशन आणि रिल बनवण्यासाठी येथे आला आहात असा थेट आरोपच सदाभाऊ खोत यांच्यावर करण्यात आला…

एकंदरित पणे आज माढा लोकसभा मतदार संघातील उंदरगाव या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्या बरोबर जे घडले ते भाजपा प्रणित शेतकरी संघटने साठी निश्चितच परिणाम दायक असणार आहे,भाजपची शेतकरी चळवळ सदाभाऊ खोत यांच्या अशा वागण्याने धोक्यात आलेली पहायला मिळत आहे…

सदाभाऊ खोत यांच्या पुढील राजकारणाची आज धोक्याची घंटा वाजली असल्याचे चित्र निर्माण झाले असून इथून पुढे सदाभाऊ खोत आणखी किती शेतकऱ्यांच्या रोषांना बळी ठरणार आहेत हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे…

उंदरगाव येथील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना आज सपशेल नाकारल्या मुळे भाजपा काय भुमिका घेते यावर राजकीय जाणकारांचे लक्ष लागले असून सदाभाऊ खोत यांनी या घटने नंतर तेथून काढता पाय घेतल्याने त्यांचे राजकारण मात्र शेवटची घटका मोजत आहे असे जनतेमधून बोलले जात आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button