शहर

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने डाळिंब व्यापारी अतिक हाजी शब्बीर बागवान यांचा गौरव…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

पंढरपुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब (अनार) विभागात सर्वाधिक डाळिंब विक्री करण्याचा मान येथील प्रसिद्ध व्यापारी अतीक हाजी शब्बीर बागवान याना मिळाला…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काल झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत माजी आमदार प्रशांतराव परिचारक (मालक) यांच्या हस्ते अतिक हाजी शब्बीर बागवान यांचा गौरव करण्यात आला…

यंदाच्या वर्षी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अव्वल दर्जाची आणि विक्रमी अशी डाळिंब विक्री केली असून या मुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे…

या दरम्यान अतिक हाजी शब्बीर बागवान यांनी त्यांच्या फर्म वर पंढरपूर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाची विक्रमी व चांगल्या दराने विक्री करून दाखवल्याने त्यांचा शाल,पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन विशेष असा गौरव करण्यात आला…

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,उपसभापती यांच्या सह सर्व संचालक मंडळ,शेतकरी,व्यापारी आणि कर्मचारी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button