महाराष्ट्र

मुंबईच्या आझाद मैदानावर “मराठ्यांचा आंतर वाली” मनोजभाई जरांगे पाटील यांचा अभूतपूर्व विजय…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते.तेव्हापासून राज्य सरकारच्या नेमलेल्या उपसमितीची बैठक वारंवार सुरू होती.या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता,न्या शिंदे समितीचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य हजर होते,या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्यात आला.

यानंतर उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारशी नंतर अंतिम मसुदा तयार करण्यात आला.त्यानंतर हा मसुदा घेऊन स्वत: राधाकृष्ण विखे पाटील जरांगेच्या भेटीला पोहचले होते.तिथे सर्व मागण्यांबाबत सरकारकडून उचललेली पावले लोकांसमोर वाचून दाखवण्यात आली…

तदनंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी झटणारे अभ्यासक आणि उच्च न्यायालयात कामे करणाऱ्या वकील मंडळींनी महाराष्ट्र सरकारने काढलेला जी आर तपासल्या नंतर मनोज भाई जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली…

महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेत आमरण सुरू असलेल्या उपोषणाची मनोज भाई जरांगे पाटील यांनी यशस्वी सांगता केली,या वेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले…

या दरम्यान गेली आठवडा भर मुंबई मुक्कामी असलेल्या मराठा समाज बांधवांनी गुलालाची मुक्त उधळण करत आनंद उत्सवच साजरा केला,या वेळी मराठा समाजाचे आंदोलक बेभान होऊन नाचताना आणि मनोज भाई जरांगे पाटील यांचा जयघोष करताना दिसत होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button