शहर

पालघर जिल्ह्यातील खडकोलीतील साईबाबा मंदिराजवळील रस्त्यांची दयनीय अवस्था… अपघातांचे प्रमाण वाढले

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

पालघर जिल्ह्यातील तालुक्यातील सफाळे तांदुळवाडी–चहाडे राहायमार्गांवर खडकोली गावातील साईबाबा मंदिरासमोरच्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?” असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. या मार्गावरून दुचाकी चालवणे धोकादायक ठरत असून वाहतुकीचा वेग मंदावल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथे वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीला पर्याय म्हणून वाहनचालक आदिवासी फाटा–वरई मार्गे हायवेचा वापर करत आहेत. मात्र या मार्गाचीही अवस्था खराब असून, पावसाळा सुरू होण्याआधीच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

याच वर्षी या मार्गावर नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. दोन नवीन मोऱ्याही बांधण्यात आल्या होत्या. तरीही काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

ग्रामस्थांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्वरित रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि गौरी सणासुदीला नागरिकांना खड्ड्यातून वाट काढण्याची वेळ आल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button