महाराष्ट्र

लावणी कलेच्या योगदानाबाबत वैशाली जाधव यांना संगीत नाटक अकादमी भारत सरकार चा उस्ताद बिस्मिल्ला खाँ (खान) युवा पुरस्कार प्रदान

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू कलाकार अनेक पुरस्कार प्राप्त बहुगणी कलावंत
वैशाली जाधव यांना संगीत नाटक अकादमी भारत सरकार चा उस्ताद बिस्मिल्ला खॅां (खान )युवा पुरस्कार ,दिल्ली येथे केंद्रीय संस्कृती पर्यटन विकास मंत्री किशन रेड्डी जी यांच्या हास्ते देऊन सन्मान्नीत करण्यात आले .
15 फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम मेघदूत थिएटर कॅाम्लेक्स रवींद्र भवन नवी दिल्ली येथे अगदी भव्यदिव्य रीतीने पार पडला .. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेचा ,उपाध्यक्ष श्री जोरावरसिंह यादव व अनेक मान्यवर या वेळेस उपस्थित होते .

महाराष्ट्रा मध्ये लावणी कलेला आपले योगदान दिल्यामुळे वैशाली जाधव यांना हा पुरस्कारा देण्यात आला भारतातील १०२ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला .माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द मोदीजीं नी या सर्व पुरस्कार सन्मानित युवा कलाकारांना संगीत नाटक अकादमी च्या एका ट्विट द्वारे शुभेच्छा दिल्या ..

या पुरस्काराच्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत वैशाली यांनी सांगितले की तिच्या साठी हा क्षण खरच खूप आनंदचा आणी अभिमाना चा क्षण आहे ,कारण तिच्या आता पर्यंत च्या करीयर मधे तीने जी काही महेनत केली त्याचे एक अगदी उत्तम बक्षीस व शाब्बासकी तिला या पुरस्कारच्या स्वरूपात मिळाली ..

ती असेही बोलली की तिच्या या प्रवासाची सुरवात अकलूज राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धे पासून झाली , अकलूज राज्यस्तरीय लावणी ने तिच्या करीयरला एक योग्य दिशा मिळवून दिली , अकलूज लावणी मुळे मी नावारूपाला आले , मला माझी एक कलावंत म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली असे ही ती बोलली .

माननीय विजयसिंह मोहीते पाटील यांच्या मुळे आशा रूपा परभणीकर या पारंपरिक लावणी संघा सोबत अमेरिका सातासमुद्रा पार महाराष्ट्रा ची लोककला लावणी सादर करण्याची संधी मिळाली .
अमेरीकेला जाताना अनेक कागदपत्री अडचणी आल्या त्या सर्व अडचणी तून बाहेर काढून व सर्व कागदपत्री मदत माननीय धैर्यशील मोहीते पाटील (भैय्या ) यांनी ही सर्व कलावंतानं केली
.
माननीय जयसिंह मोहीते पाटील हे कलावंताचे आश्रय दाते आहेत ,आणी त्यांनी अनेक कलावंतांना या लावणी स्पर्धेच्या माध्यमातून चित्रपटा मध्ये लावणी करण्यांची संधी प्राप्त करून दिली अस पण तिने सांगितले .मला ही बाळदादांनी एका चित्रपटामध्ये लावणी करण्याची संधी दिली आणी तिथून माझी चित्रपट क्षेत्रात इन्ट्री झाली .
मला चित्रपटाध्ये पहीली लावणी करण्याची संधी अकलूज च्या रंगमंचावरूनच मिळाली , व चित्रपटामध्ये नाईका म्हणून काम करण्याची संधी सुधा याच रंगमंचाने मला दिली.जाऊ तिथे खाऊ , शांकमभरी देवीचा महीमा ,घुमा अश्या अनेक चित्रपटा मध्ये मी लावणी नृत्य सादर केले .

व तमाशा हाच खेळ उद्या पुन्हा या चित्रपटा मध्ये भरत जाधव यांच्या सोबत मुख्य भूमीकेध्ये मी अभिनय केला . या चित्रपटासाठी मला मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नवीन पदार्र्पण अभिनेत्री यासाठी ,मानाचा
मानला जाणारा दादासाहेब फाळके हा पुरस्कार रमेश देव सिमा देव यांच्या हस्ते मिळाला , मठ्ठा सन्मान मध्ये ही मला या चित्रपटासाठी नामंनकन मिळाले होते , आई राजा उदे उदे या चित्रपटा मध्ये ही मी मुख्यभूमीकेत उषा नाईक , रमेश भाटकर यांच्या सोबत काम केले , लेक लाडकी या घरची या ( ई टीव्ही ) कर्लस मराठी च्या मालीके मध्ये ही मी अभिनय केला .

भोजपुरी चित्रपट गोरीया कहा तेरा गाव या चित्रपटा मध्ये पाहूणी कलाकार म्हणून काम केले .

कलर्स मराठी प्रस्तुत ढोलकीच्या तालावर या अस्सल डान्स लावणी रियालटी शो सेलिब्रिटी पर्वाची मी प्रथम क्रमांकाची विजेती ठरले व महाराष्ट्राची पहीला लावणी सम्राज्ञी म्हणून मी अमेरिका मलेशिया सिंगापूर ला सन्मानाने जाऊन आले .

नॅशनल चॅंनेल झी टीव्ही च्या दिल से नाचे इंडीया वाले या डान्स शो मध्ये मला प्रसिद्ध कोरीयोग्राफर फराह खान , दिपीका पादूकोन शाहरूख खान या प्रसिद्ध कलाकांरान कडून शाब्बासकी मिळाली .

सह्याद्री वाहिनी च्या दम दमा दम या डान्स शो मधे ही मी परीक्षक म्हणून काम केले .
मी मराठी च्या डान्स शो छूम छूम छननन मध्ये माननीय प्रकाश खांडगे सर यांच्या मुळे परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली .

नजराना लावणीचा या शो मध्ये ही मी मुख्य नृत्यांगना म्हणून काम केले .

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ॲाफ ड्रामा च्या कमेटी वर मला ३ महीने कमेटीमेमर च्या रुपाने निवडले व तिथे काम करण्याची संधी मिळाली .

अनेक अनेक इतके पुरस्कार मला मिळाले त्या सर्वच पुरस्कारांचे मी इथे उल्लेख नाही करू शकत कारण खूप सारे पुरस्कार मला कलाकार म्हणून देण्यात आले .

पण माझ्या साठी सन्मानाचा पहीला पुरस्कार अकलूजचा स्व . कै . सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील हा पुरस्कार होता, अकलूज लावणी स्पर्धा कलावंता साठी कलेचे माहेरघर आहे , वैयक्तिक या स्पर्धे मध्ये उत्कृष्ट अदाकारी सलग तीन वर्ष ,उत्कृष्ट नृत्यांगना तिन वर्ष मला पारितोषिक मिळाले , आशा रुपा परभणीकर या ग्रुप मध्ये सलग तीन वर्ष पहीला नंबर पटकावून आम्ही विजयाची हॅट्रीक केली व महाविजेता लावणी स्पर्धे मध्ये सुधा पहीला नंबर पटकावला . मी आणी माझ्या आशा रूपा दिपा परभणीकर या संघाने भारता मध्ये मुंबई ,नागपूर , दिल्ली , अश्या अनेक ठिकाणी लावणीनृत्याचे प्रयोग केले ..

मी नंतर अनेक जाहीराती साठी सुध्दा एक मॅाडेल म्हणून मॅडलींग देखील केली , एक नृत्यगंना , अभिनेत्री , आणी मॅाडेल असा माझा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता , खूप कठीण प्रसंगाचा सामना केला कष्ट केले , वेग वेगळे नृत्यांचे प्रकार जे मी कधी शिकले ही नव्हते ते सुध्दा मी शिकले व करून दाखवले ,खूप महेनत करून मी स्वताला सिध्द करण्यामध्ये काहीच कसर सोडली नाही .
तेव्हाच मी माझी एक लोककलावंत , कलाकार म्हणून ओळख निर्माण करू शकले .
माझ्या ह्या नावरूपमागे या यशाच्या शिखरावर मला पोहचवण्याचे मागे अनेक लोकांचा मोठा वाटा आहे , माननीय जयसिंह मोहीते पाटील व विजयसिंह मोहीते पाटील यांनी मला व प्रत्येक कलावंतांना खूप मोठा राज्यस्तरीय प्लॅटफॉर्मच् दिला ज्या मध्ये मी आणी माझ्या सारखे अनेक कलाकार घडले ,त्यांचे मी मनापासून आभार मानते .

माझ्या परीवार तून मला अकलूज लावणी स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणा दिली माझ्या दोन्ही मावश्यां आशा अनिता यांनी , व मला पुर्ण खंबीर पणे सहकार्य केले साथ दिली माझ्या बहीनी रूपा आणी दीपा यांनी .

माझ्या लावणी च्या गुरू सरला ताई नांदूरेकर पंचफूला नांदूरेकर यांनी मला खूप महेनती ने पारंपारीक लावणी कशी करायची हे शिकवले .

नव्यारंगाने ढगांने लावणी व इतर नृत्य प्रकार कशे सादर करायची ते मला प्रसिध्द कोरीयोग्राफर आशीष पाटील , फुलवा खामकर , व निकीता मोघे यांनी शिकवले .

नटरंग कला केंद्राचे प्रमुख किसनअप्पा जाधव यांने देखील मला मोलाचे सहयोग केले .एम टी डी सी च्या अधिकारी लता कांबळी यांनी ही सहकार्य केले .

मुंबई मध्ये महाराष्ट्र शासनाचे लावणीचे प्रयोग करत असताना डॅा . प्रकाश खांडगे सर यांनी खूप मोलाचे सहकार्य मला दिले त्यांची मुंबई मध्ये खूप मदत मिळाली , शैलाताई खांडगे ,गणेश चंदनशिवे ,, संपादीका राही भिडे यांनी ही मला प्रत्यके वेळी महत्त्वाचे मार्गदर्शन केले .
अभिनय क्षेत्रामध्ये वामन केंद्रे सर व संतोष कोल्हे सर यांनी ही खूप सहकार्य केले व मला अभिनय कसे करावे अभिनयातले बारकावे शिकवले .
माझे सर्व सह कलाकार मित्र परीवार व गुरूवर्य , या क्षेत्रातील नावजलेले कलावंत यांनी देखील मला या पारंपारीक कलेचे मार्गदर्शन दिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button