आरोग्य

माळशिरस तालुक्यातील निमा संघटनेचा आषाढीवारी मध्ये आरोग्य शिबिराचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.9921500780

मुख्यामंत्री सहाय्यता निधी कक्ष व केंद्रीय निमा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवासाठी मोफत आरोग्य तपासणी,उपचार व चरणसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

केंद्रीय निमाचे प्रवक्ते डॉ प्रताप सोमवंशी यांनी मुख्य संयोजक म्हणून काम पहिले तर डॉ हर्षवर्धन गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा आरोग्य शिबिराचे समन्व्यक म्हणून काम पहिले.यावेळी निमा संघटना अकलूज ता. माळशिरस शाखेच्या वतीने नातेपुते , माळशिरस , पिलीव , अकलूज , श्रीपूर , वेळापूर व 25/4 (लवंग ) याठिकाणी शिबीरे आयोजित करण्यात आली यावेळी माळशिरस तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय निमाचे सदस्य डॉ तानाजी कदम ,डॉ मिलिंद गुळभीले , डॉ सुधीर पोफळे तर विमेन फोरमच्या विभागीय सचिव डॉ अंजली कदम तसेच निमा अकलूज ता माळशिरस चे अध्यक्ष डॉ अमोल माने ,डॉ दादासाहेब पराडे ,डॉ प्रशांत निंबाळकर , डॉ उदयसिंह माने देशमुख , डॉ शिरीष रननवरे ,डॉ दिलीप पवार, डॉ अप्पासाहेब वाघमोडे ,डॉ तुलसीदास रूपनवर ,डॉ रमेश बिडवे ,डॉ प्रविण पाटील, डॉ मच्छिन्द्र गोरड , डॉ महेश करे ,डॉ विजय सुरवसे, डॉ डिकोळे , डॉ सुभाष कटके , डॉ उत्तम खरात , डॉ हरिशचंद्र सावंत,डॉ जावेद मुल्ला, डॉ रोहित माने देशमुख तसेच बहुसंख्य महिला डॉक्टर्स यांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button