केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांची अवैध रेती वाहतकीवर कारवाई……सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त.
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर तालुक्यातील केळवा सागरी पोलिस स्टेशन हद्दीतील टेंभिखोडावे जेट्टीजवळ गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास विनापरवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकासह अन्य पाच अशा सहा जणांवर केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी कारवाई केली आहे . या कारवाईत केळवा सागरी पोलिसांनी 2 लाख 25000 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे . केळवा सागरी पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे टेंभिखोडीवेजवळील खाडीतून आणि वैतरणा स्थानकाजवळील रेल्वेब्रीज क्रमांक 92 व 93 च्या खाडी पात्रातून अवैध रेती उत्खनन करुन रेती उपसा केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी गुरुवार 4 मार्च रोजी रात्री सव्वाबारा वाजता जलसार सजाच्या तलाठी उज्वला पाटील यांना दिली. त्यानंतर सपोनी दत्ता शेळके यांनी पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र जाधव आणि पोलिस शिपाई जयदीप सांबरे यांच्यासह टेंभिखोडावे जेट्टीच्या कच्च्या रस्त्यावर पेट्रोलिंग सुरु केली. दरम्यान सफाळे मंडळ अधिकारी तेजल पाटील आणि तलाठी उज्वला पाटील या देखील तेथे पोहोचल्या. पेट्रोलिंग करीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास टेंभिखोडावे येथील विनोद बाळाराम पाटील वय वर्षे(34) हा इसम विनापरवाना अवैधरित्या पिकअप गाडीतून रेतीची वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी तत्काळ विनोद पाटील आणि रेतीने भरलेली पिकअप गाडी असा 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन अन्य पाच जणांवर केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून या बाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके करीत आहेत.