शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे विराथन बुद्रुक जलसार हद्दीत घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा …

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय करत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे जलसार विराथन बुद्रुक अशा अनेक गावात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून स्थानिक नागरिकांना योग्य वेळेवर गॅस सिलेंडरची सुविधा मिळत नसल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

या भागातील ओमकार गॅस एजन्सी मार्फत या सर्व गावांना गॅस सुविधा पुरवली जात असून गावात जाणाऱ्या सिलेंडरच्या गाड्या या भागातील ग्रामस्थांना योग्य वेळेवर सिलेंडर गॅस पुरवत नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पैसे मोजून देखील नाहक त्रास भोगावा लागत आहे.

तर ज्या व्यक्तीकडे गॅस सिलेंडर कनेक्शन नसताना देखील बाहेरील परप्रांतीयांना गॅस सिलेंडर जास्त पैसे भरून दलालांमार्फत योग्य वेळेवर मिळत आहेत.
याबाबत या भागातील ग्रामस्थ आणि टेंभीखोडावे गावचे उपसरपंच धनेस गावड पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांची भेट घेऊन काळया बाजाराने गॅस सिलेंडर विकणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाईची मागणी करणार आहेत.

विना कनेक्शन परप्रांतीयांना या भागातील गॅस सिलेंडरचे दलाल जास्त पैसे घेऊन गॅस सुविधा पुरवत असल्यामुळे स्थानिकांना गॅस बुकिंग करून देखील गॅस मिळत नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे.
.टेंभीखोडावे उपसरपंच धनेश गावड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button