अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर…

🎯 हरकती आणि सूचना मागविण्याची अंतिम तारीख 31/08/2025
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज
अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली असून एकूण तेरा प्रभाग असलेल्या प्रत्येक प्रभागात दोन सदस्य असणार आहेत,सदर प्रभाग रचने संदर्भात हरकती व सुचना मागविण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट 2025 पर्यंत असल्याने दि 01 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2025 या कालावधीत हरकतींवर सुनावनी होऊन अंतीम रचना नगर विकास विभागाकडे सादर होणार असल्याची माहिती उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे यांनी दिली…
अकलुज ग्रामपंचायतीची नगर परिषदे मध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिली निवडणूक होत आहे.अकलूज नगर परीषदेसाठी 13 प्रभागातुन प्रत्येकी 02 असे एकुण 26 सदस्य असणार आहेत.यामध्ये प्रारुप प्रभाग,समाविष्ट भाग,लोकसंख्या पुढील प्रमाणे…
प्रभाग क्रमांक १
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ६६६
प्रभागात समाविष्ट भाग : गिरमे वस्ती,बोरावके वस्ती,संत नरहरी नगर,आंबेडकर नगर,दत्तनगर,राऊतनगर,शिवकृपा कॉलनी,जयशंकर नगर,निरामाई नगर,केएल गिरमे प्लॉट,भोरी वसाहत…
प्रभाग क्रमांक २
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ५५३
प्रभागात समाविष्ट भाग : ठवरे प्लॉट,माने वस्ती,देशपांडे घाट,अकलाई मंदिर कमान,अकलाईनगर,अकलाई स्मशानभूमी,पंचशील नगर,शिवाजी चौक,रामायण चौक,गुरु नगर,होनमाने प्लॉट,ढोर गल्ली…
प्रभाग क्रमांक ३
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ६४४
प्रभागात समाविष्ट भाग : उद्यम नगर,रामबाग वसाहत,समतानगर,रणजीत नगर शाळा,जगताप वस्ती पांढरे वस्ती,कर्मवीर चौक महादेव नगर,कृष्णप्रिया नगर,बारभाई गट…
प्रभाग क्रमांक ४
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ३६४
प्रभागात समाविष्ट भाग : शनीमंदिर,देशमुख घाट,देशपांडे घाट,शिवाजी चौक,रामायण चौक,रमामाता चौक,कुर्डूवाडी-माळशिरस रोड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,काझी गल्ली…
प्रभाग क्रमांक ५
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ६६२
प्रभागात समाविष्ट भाग : नामदेव मंगल कार्यालय,आव्हाड बोळ,लोणार गल्ली,शिवापुर पेठ,नगरपरिषद कार्यालय,काझी गल्ली,शनी मंदिर घाट…
प्रभाग क्रमांक ६
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार १९८
प्रभागात समाविष्ट भाग : विजय चौक,जयशंकर उद्यान,नौशाद बोळ,ईदगाह मैदान,कॅप्टन शेती,जोशी गल्ली,वडर गल्ली,लोणार गल्ली,खडके प्रेस…
प्रभाग क्रमांक ७
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ५५१
प्रभागात समाविष्ट भाग : सोनाज पंप,गांधी चौक,पवार वस्ती,नायर झोपडपट्टी,स्विमिंग टॅंक,नागोबा कट्टा,विकास नगर…
प्रभाग क्रमांक ८
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार १४६
प्रभागात समाविष्ट भाग : जयसिंह चौक,गांधी चौक,महावीर स्तंभ,धर्मवीर सदुभाऊ चौक,महर्षी चौक,लक्ष्मीनारायण नगर,गिरझणी चौक…
प्रभाग क्रमांक ९
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ७५८
प्रभागात समाविष्ट भाग : गांधी चौक,जुने बस स्थानक,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,महर्षी कॉलनी, इंदिरानगर,इरिगेशन कॉलनी,बॅकवर्ड हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रुग्णालय…
प्रभाग क्रमांक १०
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार २७८
प्रभागात समाविष्ट भाग : अमरदीप हॉटेल,धर्मवीर सदुभाऊ चौक,राजइंदिरा कॉम्प्लेक्स गणेश नगर कमान,व्यंकटनगर,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक…
प्रभाग क्रमांक ११
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ५२१
प्रभागात समाविष्ट भाग : शिवरत्न मोटर्स,धर्मवीर सदुभाऊ चौक,महर्षी चौक,प्रतापसिंह चौक,गणेश नगर…
प्रभाग क्रमांक १२
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार ६४३
प्रभागात समाविष्ट भाग : सुजयनगर सर्व भाग,पोलीस कॉलनी,विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल,फुलेनगर,स्टार इमॅजिन सेंटर,सह्याद्री आयटीआय,शिवाजीनगर,पटेल टिंबर,शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय,साई पार्क,सावता माळी मंदिर,गिरमे हॉटेल,भारत फुले वस्ती,नगरपरिषद विभागीय कार्यालय,सयाजीराजे नगर निम्मा भाग…
प्रभाग क्रमांक १३
एकूण सदस्य :२
लोकसंख्या : ३ हजार १४०
प्रभागात समाविष्ट भाग : शांतीनगर,बनकर वस्ती,दत्तनगर,केंगार प्लॉट,विद्यानगर,अहिल्यानगर,अर्जुन नगर,गावठाण,संजय नगर,बोडके वस्ती,मोरे वस्ती,तोरसकर वस्ती,मुलानी वस्ती…



