पालघर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या गाडीमध्ये आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन सिंग यांनी केला गोळीबार. आरोपी बोऱीवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.
जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
जयपूर ते मुंबई पॅसेंजरच्या बी-5 बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे.

आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतन सिंग यांनी हा गोळीबार केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग या ट्रेन मधून बोऱीवली स्थानकात उतरून पळून जाण्याच्या मार्गावर असताना बोऱीवली रेल्वे जीआरची पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केले आहे .
मात्र गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून आर पी एफ कॉन्स्टेबल चेतन सिंग हा सध्या बोऱीवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.



