शहर

सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड यांच्या धरणे आंदोलनास अखेर यश.

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ९९२१५००७८०

कुर्डू येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड यांनी दि १६/०३/२०२३ पासून ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीच्या घोटाळ्यासंदर्भात धरणे आंदोलन सुरू केले होते.

परंतु आज अखेर कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी सध्याच्या स्थितीत, जिल्हापरिषद कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप चालू असल्याने आपल्या मागणीबाबत कार्यालयीन कर्मचारी कामावर उपस्थित झाल्यानंतर त्यांना तात्काळ बदली झालेल्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले जातील जे कर्मचारी मुदतीत हजर न झाल्यास त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी दिल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button