शहर

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री.रजनीश शेठ यांच्या हस्ते खासदार श्री.राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत नायगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या नायगाव या नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री.रजनीश शेठ यांच्या हस्ते माननीय खासदार श्री. राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नायगाव वसई विरार शहर विभागाचे नायगाव हे 11 वे पोलीस ठाणे आहे. तर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे 17 वे नायगाव हे नवे पोलीस ठाणे आहे. वसई तालुक्यातील वालीव पोलीस ठाणे व माणिकपूर पोलीस ठाणे यांचे विभाजन करून नायगाव हे नवीन पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे.

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री.रजनीश शेठ यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी नायगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले . या उद्घाटनाप्रसंगी खासदार श्री. राजेंद्र गावित,मीरा भाईंदर पोलीस आयुक्त श्री.मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त श्री.श्रीकांत पाठक व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवीन नायगाव पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज पदी प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button